CID फेम अभिनेत्रीची पतीविरोधात पोलिसांत तक्रार, १५ महिन्यांच्या मुलाला बेदम मारहाणीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 07:58 PM2023-05-09T19:58:40+5:302023-05-09T19:59:28+5:30

१५ महिन्यांच्या बाळाला कथितरित्या जमिनीवर आपटून मारहाण केल्याचा आरोप अभिनेत्रीनं केला आहे.

CID fame actress files police complaint against husband alleging beating of 15 month old son | CID फेम अभिनेत्रीची पतीविरोधात पोलिसांत तक्रार, १५ महिन्यांच्या मुलाला बेदम मारहाणीचा आरोप

CID फेम अभिनेत्रीची पतीविरोधात पोलिसांत तक्रार, १५ महिन्यांच्या मुलाला बेदम मारहाणीचा आरोप

googlenewsNext

Chandrika Saha Filed Case Against Husband: ६ मे रोजी टीव्ही अभिनेत्री चंद्रिका साहाने तिचा २१ वर्षीय पती अमन मिश्राविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. अमनं १५ महिन्यांच्या मुलाला त्यांच्या बेडरूममध्ये कथितरित्या जमिनीवर आपटून जखमी केल्याचा आरोप चंद्रिका साहानं केलाय. बांगूर नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर अभिनेत्रीने तिच्या मुलाला एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं होते.

चंद्रिकानं दाखल केलेल्या एफआयआरनुसार, तिची २०२० मध्ये शेअर ट्रेडर अमन याच्याशी भेट झाली. गेल्या वर्षी दोघांनाही मुलगा झाला. परंतु आपला पती मुलाच्या जन्मानं आनंदी नव्हता. शुक्रवारी आपण आपल्या मुलाला बेडरुममध्ये रडताना पाहिलं आणि त्याच्या अंगावर जखमा होत्या. त्यानंतर मुलाला तिनं रुग्णालयात दाखल केलं. ज्यावेळी सीसीटीव्ही फुटेज तपासलं तेव्हा आपल्या पायाखालची जमीनच सरकली. अमननं आपल्या मुलाचं डोकं तीन वेळा जमिनीवर आपटल्याचं त्यात दिसलं असं तिनं आपल्या तक्रारीत म्हटलंय. 

चंद्रिका साहाद्वारे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे आम्ही अमन मिश्रा विरोधात जुवेनाईल जस्टिस अधिनियम २०१५ च्या कलम ७५ अंतर्गत एका मुलावर हल्ला करण्याचा गुन्हा दाखल केलाय. आम्ही त्याला अजून अटक केली नसून तपास सुरू असल्याची माहिती बांगूर नगर पोलीस स्थानकाचे सीनिअर पोलीस इन्सपेक्टर प्रमोद तावडे यांनी दिली.

चंद्रिकाचा बोलण्यास नकार

दरम्यान, टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, चंद्रिकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तिनं या प्रकरणी काहीही बोलण्यास नकार दिला. यानंतर तिनं आपल्याला यासंदर्भात काही बोलायचं नसल्याचं मेसेजद्वारे सांगितलं.

Web Title: CID fame actress files police complaint against husband alleging beating of 15 month old son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.