CID फेम दिनेश फडणीस यांनी निधनाच्या काही दिवसांपूर्वीच शेअर केलेला नातीबरोबरचा फोटो, 'ती' पोस्ट ठरली शेवटची
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 11:13 IST2023-12-05T11:12:49+5:302023-12-05T11:13:23+5:30
CID फेम अभिनेता दिनेश फडणीस यांचं निधन झालं आहे. निधनाच्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट शेअर केली होती.

CID फेम दिनेश फडणीस यांनी निधनाच्या काही दिवसांपूर्वीच शेअर केलेला नातीबरोबरचा फोटो, 'ती' पोस्ट ठरली शेवटची
CID फेम अभिनेता दिनेश फडणीस यांचं निधन झालं आहे. ते ५७ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीत खालावल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अखेर त्यांची मृत्यूशी झुंज संपली. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली असून कुटुंबीय आणि चाहत्यांना धक्का बसला आहे.
निधनाच्या काही दिवसांपूर्वीच दिनेश यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट शेअर केली होती. दिनेश यांनी त्यांच्या नातीबरोबरचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. दुर्देवाने त्यांची ही पोस्ट शेवटची ठरली आहे. त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत चाहते दु:ख व्यक्त करत आहेत.
दिनेश यांचं त्यांच्या नातीबरोबर खास नातं होतं. त्या दोघांचा वाढदिवसही एकाच दिवशी असायचा. नातीबरोबर मस्ती करतानाचे अनेक व्हिडिओ दिनेश सोशल मीडियावर शेअर करताना दिसायचे.
टीव्हीवरील CID या लोकप्रिय मालिकेत फ्रेडिरिक्स ही भूमिका साकारून ते घराघरात पोहोचले होते. थोडीशी विनोदी झटा असलेली ही भूमिका त्यांनी अत्यंत सुंदररित्या साकारली होती.१९९८ ते २०१८ पर्यंत त्यांनी ही भूमिका केली. त्यानंतर ते 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतही झळकले होते. त्यांनी 'सरफरोश', 'मेला', 'ऑफिसर' या हिंदी चित्रपटांतही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.