अभिजीतने दयाला का मारलं? CID मध्ये मोठा ट्विस्ट, दमदार प्रोमो एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 01:37 PM2024-10-27T13:37:19+5:302024-10-27T13:37:37+5:30

CID मालिका नव्याने सुरू होणार आहे. पण, या मालिकेच्या दुसऱ्या सीझनमध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. 

cid new promo release why does abhijeet killing daya acp pradyuman watch video | अभिजीतने दयाला का मारलं? CID मध्ये मोठा ट्विस्ट, दमदार प्रोमो एकदा पाहाच

अभिजीतने दयाला का मारलं? CID मध्ये मोठा ट्विस्ट, दमदार प्रोमो एकदा पाहाच

टेलिव्हिजनवरील सगळ्यात लोकप्रिय आणि आवडती क्राइम सीरिज म्हणजे सीआयडी (CID). एसपी प्रद्युमन, इनस्पेक्टर दया आणि अभिजीत या पात्रांनी प्रेक्षकांना भुरळ घातली. टीमबरोबर मिळून एसपी प्रद्युमन घडलेल्या गुन्ह्याचा तपास करत सत्य शोधून काढायचे. ९०च्या दशकातील या मालिकेने प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं. आता एसपी प्रद्युमन आणि त्यांची टीम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. CID मालिका नव्याने सुरू होणार आहे. पण, या मालिकेच्या दुसऱ्या सीझनमध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. 

CID मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये एके काळी जिवलग दोस्त असणारे अभिजीत आणि दया आता एकमेकांचे शत्रू झाल्याचं दिसत आहे. प्रोमोमध्ये अभिजीत आणि दया एका टेकडीवर दिसत आहेत. अभिजीत दयाला गोळी मारत असल्याचं पाहायला मिळत आहे. तेवढ्यात तिथे एसपी प्रद्युमनही येत असल्याचं दिसत आहे. हा प्रोमो पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. अभिजीतने दयाला का मारलं? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी CID चा नवा सीझन प्रेक्षकांना पाहावा लागणार आहे.


ACP प्रद्युमनची भूमिका साकारणारे शिवाजी साटम म्हणतात, “मालिकेच्या या आवृत्तीत दया-अभिजीत यांची जोडगोळी तुटली आहे आणि आता दोघे एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. CID चा पायाच हलून गेला आहे. आणि ACP प्रद्युमनचे विश्व उलट-पालट होणार आहे. सहा वर्षांनी पुन्हा ACP प्रद्युमन म्हणून परत येणे स्वप्नवत वाटते आहे. या व्यक्तिरेखेला भरभरून प्रेम मिळाले आहे आणि आम्ही प्रेक्षकांना रहस्य आणि हृदयाची धडधड वाढवणाऱ्या नाट्याने भरलेली थरारक सफर घडवण्याची हमी देतो.”

Web Title: cid new promo release why does abhijeet killing daya acp pradyuman watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.