जब प्यार किया तो डरना क्या?.... सलीम-अनारकलीची प्रेमकथा आता छोट्या पडद्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 12:31 PM2018-09-27T12:31:22+5:302018-09-27T12:32:44+5:30
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सर्जनशीलतेने आम्ही आमच्या प्रेक्षकांना एक भव्य सिनेमॅटिक अनुभव देणार आहोत.
या चिरंतन प्रणयरम्य नाट्यामध्ये नामवंत कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत, शाहीर शेख, सोनारिका भदोरिया, अरुणा ईराणी, गुरदीप सिंह कोहली आणि शाहबाज खान प्रेझेंटेड बाय डाबर रेड पेस्ट आणि पॉवर्ड बाय एमडीएच डेगी मिर्च, दास्तान-ए-मोहब्बतः सलीम अनारकली सुरू होत आहे १ ऑक्टोबर रोजी आणि प्रसारीत होणार आहे. मुघल साम्राज्याला हादरवून सोडणारे प्रेम, तरूण अनभिषिक्त युवराज आणि एक सुंदर कनीज यांच्यातील चिरंतन प्रणय- कलर्स ही प्रेमकथा पुन्हा घेऊन येण्यासाठी सज्ज झाला आहे दास्तान-ए-मोहब्बतः सलीम अनारकली मधून.
प्रेझेंटेड बाय डाबर रेड पेस्ट आणि पॉवर्ड बाय एमडीएच डेगी मिर्च, दास्तान-ए-मोहब्बतः सलीम अनारकली मध्ये देखणा तरूण मुघल युवराज सलीम (शाहीर शेख) आणि मोहिनी घालणारी कनीज अनारकली (भूमिका करत आहे सोनारिका भदोरिया) यांची कथा दाखविली जाणार आहे ज्यांनी नियम तोडले होते आणि त्यांच्या प्रेमासाठी झुंज दिली होती. या महान कलाकृती मध्ये नामवंत अभिनेते शाहबाज खान अकबराची भूमिका साकारत आहेत तर गुरदीप कोहली पंज जोधाची भूमिका साकारत आहे आणि अरूणा ईराणी हमिदा बेगमची. टेलिव्हिजन वरील लाडके चेहेरे, पियुष सहदेव, तसनीम शेख आणि पार्वती सोहगल सुध्दा या बंडखोर प्रेमकथेच्या नाट्या मध्ये सामील होणार आहेत.
या प्रगती विषयी बोलताना, हिंदी मास एंटरटेनमेंटच्या चिफ कंटेंट ऑफिसर, मनीषा शर्मा म्हणाल्या, “ऐतिहासिक पार्श्वभूमिवरील हा शो युवराज सलीम आणि त्याचे त्याची कनीज असलेल्या अनारकली वरील प्रेमाची महान प्रेमकथा पुन्हा सादर करत आहे. समाजात निषिध्द असलेल्या या प्रेमासाठी सलीम वर त्याचे वडील अकबरांकडून बंदी घालण्यात आल्यावर तो त्याचे युवराजपद सुध्दा त्याग करण्यास तयार होतो, त्यातून निर्माण होणारी ही आकर्षक शोकांतिका आहे.
आम्ही शाहीर शेख, सोनारिका भदोरिया, गुरदीप कोहली पंज आणि अरूणा ईराणी सारखे निष्णात अभिनेते या शोची महान पात्रे साकारण्या साठी निवडले आहेत. कलर्स वरील या वैशिष्ट्यपूर्ण निवेदनाकडे प्रेक्षक नक्कीच आकर्षित होतील कारण यात असा कालखंड साकारला जाणार आहे ज्या विषयी ऐकत आणि वाचत आपण सर्वजण मोठे झालो आहोत. या पिढीला या सदाबहार प्रेमकथे विषयी सांगण्याची आता वेळ आली आहे.”
रायटर्स गॅलक्सी, दास्तान-ए-मोहब्बतः सलीम अनारकलीचे निर्माते आणि कर्ते अनिरुध्द पाठक म्हणाले, “मुघल कालखंडातील गतिशीलता हा शो आणतो आहे आणि त्यात सलीम व अनारकली मधील प्रेमसंबंध साकारले आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सर्जनशीलतेने आम्ही आमच्या प्रेक्षकांना एक भव्य सिनेमॅटिक अनुभव देणार आहोत. शोची भव्यता लक्षात ठेवून आम्ही सर्वात चांगली टीम निवडली आहे आणि त्यातून जास्तीत जास्त लिहिल्या गेलेल्या या इतिहासाचे प्रतिबिंब सादर करण्यात आम्हाला मदत झाली आहे.”
सलीमची भूमिका साकारणारा शाहीर शेख म्हणाला, “सलीमची भूमिका करणे हे अभिनेत्यांचे स्वप्न असते. मला वाटते की या पात्राचे स्तर आणि वेदना साकारणे हे जास्त अवघड आहे. तो एक अतिशय क्लिष्ट व्यक्तिमत्वाचा होता आणि त्यामुळे ते इतके सोपे नाही- पण म्हणूनच मला ही भूमिका आवडली. निर्मात्यांनी तो लुक आणि सेट अतिसय छान केले आहेत आणि आम्हाला आशा आहे की आम्ही या पात्रांना न्याय देऊ शकू. एक टिव्ही अभिनेता असल्यामुळे आम्हाला पर्याय खूप कमी असतात आणि सलीमची विख्यात भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याचा मला अतिशय आनंद झाला आहे.”
नारकली साकारणारी सोनारिका भदोरिया म्हणाली, “युवराज सलीम आणि कनीज अनारकली यांच्या अमर्त्य प्रेमाची गाथा असलेला हा शो आहे. नियम आणि समाजाची बंधने तोडून प्रेमाला प्राधान्य देणारा संदेश यात दिलेला आहे. अनारकली सारखे सशक्त पात्र साकारताना त्या भोवती खूप गूढतेचे वलय असते. हे पात्र बारकाईने साकारण्यासाठी मी कथकचे धडे गिरवत आहे.” सलीम आणि अनारकली यांच्यातील उत्कट प्रेम इतिहासात अमर्त्य बनले आहे आणि आता ते एका सशक्त गुंफलेल्या निवेदनातून पुन्हा सादर होत आहे.