तो येतोय... पुन्हा एकदा तोच कल्ला, रितेश देशमुखसोबत 'बिग बॉस मराठी'चा खास धमाका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 15:12 IST2025-02-02T15:12:16+5:302025-02-02T15:12:39+5:30

आता प्रेक्षकांना पुन्हा एकदा 'बिग बॉस मराठी'चा आनंद घेता येणार आहे. 

Colors Marathi Bigg Boss Marathi Season 5 Will Be Re Broadcasted See Riteish Deshmukh New Promo | तो येतोय... पुन्हा एकदा तोच कल्ला, रितेश देशमुखसोबत 'बिग बॉस मराठी'चा खास धमाका!

तो येतोय... पुन्हा एकदा तोच कल्ला, रितेश देशमुखसोबत 'बिग बॉस मराठी'चा खास धमाका!

'बिग बॉस मराठी'चं पाचवं पर्व (Bigg Boss Marathi Season 5) हे सर्वांत जास्त गाजेलेलं पर्व ठरलं होतं. तब्बल दोन वर्षांनी बिग बॉस मराठीचा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. रितेश देशमुखच्या (Ritiesh Deshmukh) होस्टिंगमुळे सुरुवातीलाच प्रेक्षकांना एक मोठं सरप्राईज मिळालं होतं.  १०० नाही तर फक्त ७० दिवस चालेल्या या पर्वानं टीआरपीचे सर्व रेकॉर्ड मोडले. सुरज चव्हाण हा या पर्वाचा विजेता ठरला होता, तर अभिजित सावंत हा रनरअप ठरला होता. या सीझनची भलतीच क्रेझ प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळाली होती. 

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वातील एकापेक्षा एक असेल्या सर्वंच स्पर्धकांनी प्रेक्षकाचं भरपूर मनोरंजन केलं. निक्की तांबोळीचा बाईSSS हा शब्द असो किंवा सूरज चव्हाणचा झापूक झुपूक डान्स प्रचंड व्हायरल झाला, त्यावर रीलही बनवल्या गेल्या. विशेष म्हणजे रितेश देशमुखच्या होस्टिंगने तर सर्वांचं मन जिकलं. आता प्रेक्षकांना पुन्हा एकदा 'बिग बॉस मराठी'चा आनंद घेता येणार आहे. 

'बिग बॉस मराठी'चं पर्व संपून आता चार महिने उलटले आहेत. तरीही या सीझनची अजूनही बरीच चर्चा सुरु आहे. त्यामुळे 'बिग बॉस मराठी'नं लाडक्या प्रेक्षकांसाठी पाचव्या पर्वाचं पुनःप्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला आहे.  याची अधिकृत घोषणा कलर्स मराठीनं (Colors Marathi) केली आहे. कलर्स मराठीनं आपल्या इन्स्टाग्रामवर प्रोमो शेअर केला आहे. येत्या १० फेब्रुवारीपासून दररोज दुपारी ३वाजता कलर्स मराठीवर वाहिनीवर पुनःप्रक्षेपण होत आहे. यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे.


१६ स्पर्धकांचा 'बिग बॉस'च्या घरात प्रवेश घेतला होता 
वर्षा उसगांवकर, कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर, निखिल दामले, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घन:श्याम दरवडे, इरिना रूडाकोवा, निक्की तांबोळी, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, आर्या जाधव, धनंजय पोवार, पुरुषोत्तमदादा पाटील, सूरज चव्हाण या स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली होती. 

Web Title: Colors Marathi Bigg Boss Marathi Season 5 Will Be Re Broadcasted See Riteish Deshmukh New Promo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.