२ वर्षांनी 'भाग्य दिले तु मला' मालिकेची एक्झिट! ही नवी सिरीयल सुरू होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 15:59 IST2024-04-17T15:56:22+5:302024-04-17T15:59:30+5:30
कलर्स मराठी वाहिनीवरील 'भाग्य दिले तु मला' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

२ वर्षांनी 'भाग्य दिले तु मला' मालिकेची एक्झिट! ही नवी सिरीयल सुरू होणार
Bhagya Dile Tu Mala : कलर्स मराठी वाहिनीने टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी आता कंबर कसली आहे. त्यामुळे नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. अलिकडेच अभिनेत्री स्पृहा देशमुख तसेच सागर देशमुख यांच्या 'सुख कळले' या मालिकेच्या प्रोमो नुकताच प्रसारित करण्यात आला. त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. पण, या मालिकेमुळे कलर्स मराठी वाहिनीवरील कोणती मालिका एक्झिट घेणार असा प्रश्न प्रेक्षक वर्गाला सतावत होता. अखेरीस या संदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे.
गेले काही दिवस या मालिकेच्या टीआरपीमध्ये कमालीची घसरण पाहायला मिळते आहे. तसंच अलिकडेच या मालिकेचा शेवटचा भाग चित्रीत करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. असं असलं तरी सुद्धा कलर्स मराठी वाहिनीने याबाबत कोणताही घोषणा केलेली नाही.
भाग्य दिले तु मला ही मालिका कन्नड मालिका कन्नदतीचा रिमेक आहे. अभिनेत्री तन्वी मुंडले, अभिनेता विवेक सांगळे आणि निवेदिता सराफ मुख्य भूमिकेत असलेली ही मालिकेने अल्पवधीतच चाहत्यांच्या मनात घर केलं. साधारणत: २०२२ मध्ये ही मालिका सुरू झाली होती. त्यानंतर जवळपास दोन वर्षानंतर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.