'या' गोष्टीमुळे चक्क सात महिने अली असगरने स्विकारली नाही एकही ऑफर, हे आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 20:30 IST2019-02-11T20:30:00+5:302019-02-11T20:30:00+5:30
कोणतंही स्कीट सादर करताना स्टेजवरील एनर्जी, आपल्या सहकलाकारासह असलेलं त्याचं ट्युनिंग यामुळे तो रसिकांना खळखळून हसवायचा. स्त्री पात्र साकारतानाही त्याचं कॉमेडीचं अफलातून टायमिंग दिसून यायचं.

'या' गोष्टीमुळे चक्क सात महिने अली असगरने स्विकारली नाही एकही ऑफर, हे आहे कारण
'द कपिल शर्मा' या कॉमेडी शोमधून रसिकांना खळखळून हसवणारा तसंच त्यांची सगळी दुःख विसरायला लावणारा आणि तुफान मनोरंजन करणारा कॉमेडी अभिनेता म्हणजे अली असगर. 'द कपिल शर्मा' शोमध्ये नानीची भूमिका अलीने मोठ्या खुबीने साकारली होती. त्यामुळे अली असगर नाव घेताच रसिकांच्या डोळ्यासमोर त्याने साकारलेली नानी नाही आठवली तरच नवल. विविध स्कीट्सच्या माध्यमातून तो रसिकांचं मनोरंजन करायचा. त्याचं कॉमेडीचं भन्नाट टायमिंग आणि विविध भूमिका रसिकांना कायम भावतात. कोणतंही स्कीट सादर करताना स्टेजवरील एनर्जी, आपल्या सहकलाकारासह असलेलं त्याचं ट्युनिंग यामुळे तो रसिकांना खळखळून हसवायचा. स्त्री पात्र साकारतानाही त्याचं कॉमेडीचं अफलातून टायमिंग दिसून यायचं.
त्यात जराही वावगेपण किंवा अश्लीलपणा वाटायचे नाही. त्यामुळंच अलीची स्त्री पात्रांनीही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवली. मात्र अलीला आता काहीतरी वेगळे करायचे आहे. एकाच साचेबद्ध पठडीतले काम करण्यात कोणत्याच कलाकाराला रस नसतो. अगदी त्याचप्रमाणे अलीलाही स्त्री पात्र साकारण्याची इच्छा राहिलेली नाही. खुद्द अलीने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे. तसेच एक सारख्या ऑफर्स मिळाल्यामुळे मी रोल स्विकारणेही बंद केल्याचे त्याने सांगितले. यामुळे मी सात महिने घरात बसून राहिलो. स्त्री पात्र साकारण्या पेक्षा वेगळी काही तरी भूमिका साकारायची आहे असे अलीने ठरवले आहे.'