कॉमेडियन भरती सिंग हॉस्पिटलमध्ये दाखल, कमरेला झाली दुखापत, वाचा नेमकं काय घडलं ...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 10:11 AM2023-09-16T10:11:10+5:302023-09-16T10:34:44+5:30

पती हर्ष लिंबाचिया तिला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला.

Comedian Bharti Singh admitted to the hospital, fell while looking at the phone etc | कॉमेडियन भरती सिंग हॉस्पिटलमध्ये दाखल, कमरेला झाली दुखापत, वाचा नेमकं काय घडलं ...

कॉमेडियन भरती सिंग हॉस्पिटलमध्ये दाखल, कमरेला झाली दुखापत, वाचा नेमकं काय घडलं ...

googlenewsNext

प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंगने चाहत्यांना खूप हसवले आहे. शोसोबतच, ती यूट्यूबवर स्वतःचे चॅनल देखील चालवते, ज्यामध्ये ती चाहत्यांना तिच्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींबद्दल सांगत असते. अलीकडेच भारती सिंहने तिच्यासोबत झालेल्या अपघाताबाबत खुलासा केला आहे. 

 भारती सिंहने चाहत्यांना सांगितले की ती बेडवरून पडली आणि तिच्या पाठीला गंभीर दुखापत झाली.तिने व्लॉगमध्ये सांगितले की ती बेडवरून कशी पडली. ‘माझी पाठ खूप दुखते आहे, मी बेडवरून पडले’ असं म्हणत तिने व्हिडिओ सुरू केला.  भारतीने एका नवीन ब्लॉगमध्ये तिची हेल्थ अपडेट दिली आहे. जे व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


व्लॉगमध्ये भारतीने सांगितले की, जेव्हा हा अपघात झाला तेव्हा ती हेड मसाज घेत होती. तिच्या हातात फोन होता आणि तिचे लक्ष विचलित झाल्याने ती अचानक बेडवरून पडली भारतीने सांगितले की, यावेळी तिच्यासाठी खूप मजा आली. पडल्यावर ती स्वतःच खूप हसायला लागली.


वजन जास्त असल्यामुळे तिला कोणीही उचलू शकत नसल्याचा खुलासाही भारतीने केला. अशा स्थितीत ती स्वतः हसून उठली. व्हिडिओमध्ये, भारतीने सांगितलं केले की तिला पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. पती हर्ष लिंबाचिया तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता. तिकडे तिचे एक्स-रे काढण्यात आले. डॉक्टरांनी भारतीला पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे. कॉमेडियन तिच्या नवीन व्लॉगमध्ये ती पूर्णपणे फिट असल्याचे दिसते आहे. 

Web Title: Comedian Bharti Singh admitted to the hospital, fell while looking at the phone etc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.