Bharti Singhला मुलाचे फोटो शेअर करणं पडलं महागात, संतापलेले नेटकरी म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 14:03 IST2022-07-25T13:59:40+5:302022-07-25T14:03:05+5:30
Lakshya Limbachiyaa Photoshoot : भारतीला मुलाचं बेबीशूट शेअर करणं चांगलंच अंगाशी आलंय. नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलंय,

Bharti Singhला मुलाचे फोटो शेअर करणं पडलं महागात, संतापलेले नेटकरी म्हणाले...
प्रसिद्ध लाफ्टरक्वीन भारती सिंह (bharti singh)ने काही महिन्यांपूर्वीच एका चिमुकल्या बाळाला जन्म दिला आहे. भारतीने तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिल्यापासून सोशल मीडियावर त्याची तुफान चर्चा रंगली होती. या बाळाला पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. इतकंच नाही तर भारतीदेखील सोशल मीडियावर या बाळासंदर्भातील पोस्ट शेअर करायची. मात्र, त्याचा चेहरा तिने रिव्हिल केला नव्हता. अखेर बऱ्याच महिन्यानंतर तिने बाळाचा पहिला फोटो शेअर केला. त्यानंतर आता तिने लक्ष्यचे फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलं आहे. त्यानंतर तिला नेटकऱ्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
भारती तिच्या मुलाचे वेगवेगळ्या लूक आणि स्टाइलमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. या सीक्वेन्समध्ये नुकत्याच एक फोटो शेअर केला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये भारती सिंगची मुलगी लक्ष्य पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेल्या खुर्चीवर बसलेली दिसत आहे. पण या फोटोमध्ये एका गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. वास्तविक, या फोटोमध्ये लक्ष्याच्या शेजारी एक हुक्का दिसत आहे.
लक्ष्याच्या या फोटोत दिसणारा हुक्का खोटा आहे मात्र चाहते भारतीवर संतापले आहेत. एका यूजरने लिहिले, 'बाळ खूप गोंडस दिसत आहे, पण हुक्का आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे, तो अजिबात चांगला नाही.' तर दुसऱ्याने लिहिले आहे की 'बाकी सर्व काही ठीक आहे पण हा हुक्का कोणत्या आनंदात ठेवलाय. याशिवाय हा हुक्का पाहून इतरही अनेक जण प्रश्न उपस्थित करताना दिसले.फोटोत दिसणारा हुक्का खोटा असला तरी चाहत्यांना तो फारसा आवडला नाही.
दरम्यान, भारतीने ३ डिसेंबर २०१७ रोजी हर्ष लिंबाचियासह लग्नगाठ बांधली. त्यानंतर भारतीने ३ एप्रिल २०२२ रोजी तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. या बाळाचं नाव लक्ष्य असं असून भारती त्याला प्रेमाने गोला असं म्हणते.