लोक वाईट पद्धतीने स्पर्श करायचे...; सांगताना भारती सिंग झाली भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 03:11 PM2021-07-18T15:11:20+5:302021-07-18T15:11:39+5:30

कॉमेडियन भारती सिंगलाही बालपणात कित्येक संघर्षांचा सामना करावा लागला. आपल्या भूतकाळातील काही कटु गोष्टी तिनं चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत.

comedian bharti singh reveal the pain of casting couch in film industry |  लोक वाईट पद्धतीने स्पर्श करायचे...; सांगताना भारती सिंग झाली भावुक

 लोक वाईट पद्धतीने स्पर्श करायचे...; सांगताना भारती सिंग झाली भावुक

googlenewsNext
ठळक मुद्देआज भारतीला पाहून ती कधीकाळी नॅशनल लेव्हलची शूटर होती, यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही. पण भारती एक नॅशनल लेव्हलची रायफल शूटर होती.

भारती सिंग  ( Bharti Singh )आज टीव्हीची कॉमेडी क्वीन म्हणून ओळखली जाते. इंडस्ट्रीत गॉडफादर नसताना तिनं स्वबळावर स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं. अर्थात करिअरच्या सुरूवातीला तिलाही अनेक कटू अनुभवातून जावं लागलं. तिचा हा अनुभव ऐकून चाहतेही स्तब्ध होतील. ( Bharti Singh tears down while sharing her bad experience )

मी प्रत्येक ठिकाणी आईला सोबत न्यायचे...
करिअरच्या सुरूवातीला मी प्रत्येक ठिकाणी आईला सोबत न्यायचे.   अनेकदा शोचे संयोजक चुकीचं वागत. माझ्या पाठीवरून हात फिरवत. एकाने माझ्या कमरेला हात रगडला होता. मला ते खटकायचं. पण ते माझ्या काकाच्या वयाचे आहेत, ते चुकीचं का वागतील, असं मला वाटायचं. कारण त्यावेळी मला अनेक गोष्टी कळत नव्हत्या. माझ्यात आत्मविश्वासही नव्हता. आज ते आठवलं की, मी किती मूर्ख होते, असं मला वाटतं.

बालपणी खूप भोगलं...

 माझी आई दुसºयांच्या घरी जेवन बनवायची आणि देवीसाठी कपडे शिवायची.   घरात नेहमी शिलाई मशिनचा आवाज असायचा. मी 21 वर्षे याच गोंगागाट काढले आहेत. आमच्या घरी भाजीपाला नसायचा. अनेकदा मी मीठ भाकर खाऊन दिवस काढले. माझी फार मोठी स्वप्न नाहीत पण मी देवाकडे प्रार्थना करते की माझ्याकडे जे काही आहे ते असच राहू दे. आम्ही मीठ आणि भाकरी खाल्ली आहे पण आता आमच्याकडे डाळ, भात, भाकरी सगळं काही आहे. मला आशा आहे की माझ्या परिवाराकडे कमीत कमी डाळ तरी खाण्यासाठी असेन. मला आता ते दिवस पुन्हा भोगायचे नाहीत, असं ती या मुलाखतीत म्हणाली.

नॅशनल लेव्हलची शूटर
आज भारतीला पाहून ती कधीकाळी नॅशनल लेव्हलची शूटर होती, यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही. पण भारती एक नॅशनल लेव्हलची रायफल शूटर होती. 12 वर्षापूर्वी नॅशनल लेव्हलवर पंजाबकडून खेळलीआहे. खेळत असताना तिला सरकारकडून फुकट जेवण मिळायचं, सोबत रोजचे 15 रूपये आणि 5 रूपयांचं एक कुपन मिळायचं. 5 रूपयाच्या कुपनने ती रोज ज्यूस प्यायची. जेणेकरून तिला प्रॅक्टिस करताना ताकद मिळेल. काही कूपन वाचवून महिन्याअखेर ती त्यातून फळं खरेदी करून घरी न्यायची.

Web Title: comedian bharti singh reveal the pain of casting couch in film industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.