सुगंधा मिश्राने दिला मुलीला जन्म, Video शेअर करत संकेत भोसलेने दाखवली लेकीची झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 13:58 IST2023-12-15T13:56:47+5:302023-12-15T13:58:25+5:30
मुलीच्या जन्मामुळे संकेत आणि सुगंधा दोघांच्याही कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.

सुगंधा मिश्राने दिला मुलीला जन्म, Video शेअर करत संकेत भोसलेने दाखवली लेकीची झलक
'द कपिल शर्मा' फेम कॉमेडियन आणि सिंगर सुगंधा मिश्राने (Sugandha Mishra) मुलीला जन्म दिला आहे. तिचा पती आणि कॉमेडियन संकेत भोसलेने (Sanket Bhosale) इन्स्टाग्रामवर लेकीची झलक दाखवत चाहत्यांसोबत ही बातमी शेअर केली. मुलीच्या जन्मामुळे संकेत आणि सुगंधा दोघांच्याही कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. लवकरच चिमुकलीला घरी आणत तिच्या स्वागताची तयारी कुटुंबातील सर्वजण करत आहेत.
अभिनेत्री, कॉमेडियन आणि गायिका सुगंधा मिश्राने ऑक्टोबर महिन्यात आपल्या प्रेग्नंसीची घोषणा केली होती. लग्नानंतर अडीच वर्षांनी तिने पहिल्या बाळाला जन्म दिला आहे. पती संकेत भोसलेने सोशल मीडियावर एक क्युट व्हिडिओ शेअर केला आहे. हा हॉस्पिटमधला व्हिडिओ असून संकेत म्हणतो, 'आजची ताजी बातमी आहे की मी बाबा झालो आहे आणि सुगंधा आई झाली आहे.' पुढे व्हिडिओत संकेतने लेकीची झलकही दाखवली आहे. त्याने व्हिडिओला कॅप्शन देत लिहिले,'युनिव्हर्सने आम्हाला सर्वात जादुई आशीर्वाद दिला आहे. आमच्या प्रेमाचं प्रतीक. आम्हाला कन्यारत्न प्राप्त झालं आहे. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद कायम राहू द्या.'
सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले दोघंही 'कपिल शर्मा शो' मधून लोकप्रिय झाले. दोघांचंही कॉमिक टायमिंग जबरदस्त आहे. शिवाय सुगंधाचा आवाज खूपच गोड असून ती उत्कृष्ट गाते. तर संकेत मिमिक्री करण्यात तरबेज आहे. तो संजय दत्तची मिमिक्री अनेकदा करत असतो. २०२१ मध्ये सुगंधा आणि संकेत लग्नबंधनात अडकले. आता दोघांनी आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं आहे.