कॉमेडीला कोणतीच बंधनं नसतात झाकीर खान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2017 12:06 PM2017-09-07T12:06:09+5:302017-09-07T17:36:09+5:30

ऑन एअर विथ एआयबी या युट्युबवरील कार्यक्रमामुळे नावारूपाला आलेला झाकीर खान द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमात मेन्टॉरची ...

Comedy has no restrictions, Zakir Khan | कॉमेडीला कोणतीच बंधनं नसतात झाकीर खान

कॉमेडीला कोणतीच बंधनं नसतात झाकीर खान

googlenewsNext
एअर विथ एआयबी या युट्युबवरील कार्यक्रमामुळे नावारूपाला आलेला झाकीर खान द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमात मेन्टॉरची भूमिका साकारणार आहे. त्याच्या या नव्या इनिंगबाबत त्याच्याशी मारलेल्या गप्पा...

द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमाचे आतापर्यंतचे सगळे सिझन चांगलेच गाजले आहेत, या सिझनचे वेगळेपण काय असणार आहे?
आजवरच्या द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजच्या सिझनमध्ये केवळ परीक्षक असायचे. तसेच प्रत्येक स्पर्धक आपले परफॉर्मन्स एकटे सादर करायचे. पण यंदाच्या सिझनचा कॉन्सेप्टच खूप वेगळा आहे. या कार्यक्रमाचे परीक्षण अक्षय कुमार करणार आहेत आणि स्पर्धकांच्या मदतीसाठी मेन्टर असणार आहेत. मी देखील एक मेन्टर असून माझी एक टीम असणार आहे. माझ्या टीममधील स्पर्धकांचे परफॉर्मन्स अधिकाधिक चांगले व्हावेत यासाठी मी त्यांना मार्गदर्शन करणार आहे. आजवरचे द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजचे सगळे सिझन मी पाहिले असून या सिझनचा मी फॅन आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचा भाग व्हायची संधी मिळाल्याने मी खूपच खूश आहे.

तूझ्या मते कॉमेडी ही कशाप्रकारची असावी?
कॉमेडी ही एक कला आहे. प्रत्येक कलेद्वारे आपण आपल्या सोसायटीचे प्रतिबिंब दाखवत असतो. आपल्या आजूबाजूच्याच गोष्टींचे निरीक्षण करून कॉमेडीयन प्रेक्षकांना हसवत असतात. प्रत्येकाला काय आवडेल ही त्यांची चॉईस असते. त्यामुळे कॉमेडीला कोणत्याच सीमा असू नयेत असे मला वाटते. कॉमेडी ही व्हेज करावी की नॉन-व्हेज हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.

तू आजवर युट्युब या माध्यमात काम केले आहेस, आता पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर झळकत आहेत. या दोन्ही माध्यमांमध्ये तुला काय फरक जाणवतो?
मी माझ्या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. पण या माध्यमांमध्ये काय फरक असल्याचे मला जाणवत नाहीये. कोणत्याही माध्यमांमध्ये कन्टेंट हा अतिशय महत्त्वाचा असतो. दोन्ही माध्यमांमध्ये त्याला तितकेच महत्त्व दिले जाते. आणि सोशल मीडियावरील कन्टेंटना सेन्सॉरशिप नसते. त्यामुळे तिथे शिव्या देणे, वाईट शब्द वापरणे सर्रास चालते असे सगळ्यांचे मत असते. पण माझ्यामते आपल्या प्रेक्षकांना शिव्या, वाईट शब्द आवडत नाहीत. यामुळे तुमच्या व्हिडिओला तितकेसे व्ह्युव्ज मिळत नाहीत. त्यामुळे सगळे काही ऑनलाइनवर चालते हे म्हणणेच चुकीचे आहे.

अक्षय कुमारसोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे?
मी अक्षय कुमार यांचा खूप मोठा फॅन आहे. या कार्यक्रमाचे चित्रीकरण करताना ते माणूस म्हणून किती चांगले आहेत हे मला कळले आहे. त्यामुळेच मी त्यांच्या अभिनयाचाच नव्हे तर त्यांचा देखील फॅन बनलो आहे.


Also Read : ऐकलेत का अक्षय कुमार आहे गरोदर

 


Web Title: Comedy has no restrictions, Zakir Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.