मोना सिंगला करायचीय कॉमेडी भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2016 10:17 AM2016-06-07T10:17:26+5:302016-06-07T15:47:26+5:30

कवच... काली शक्तियों से या मालिकेत प्रेक्षकांना तू एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे असे म्हटले जात आहे. तू ...

The comedy role of Mona Singh | मोना सिंगला करायचीय कॉमेडी भूमिका

मोना सिंगला करायचीय कॉमेडी भूमिका

googlenewsNext
ong>कवच... काली शक्तियों से या मालिकेत प्रेक्षकांना तू एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे असे म्हटले जात आहे. तू या मालिकेत पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारत आहेस, तुझ्या भूमिकेबद्दल काही सांग.
मी आतापर्यंत सगळ्याच मालिकांमध्ये सकारात्मक व्यक्तिरेखा साकारली आहे. पण या मालिकेत मी एकाच वेळी दोन भूमिका साकारणार आहे. एक भूमिका ही सकारात्मक असून दुसरी भूमिका नकारात्मक आहे. या मालिकेत प्रेक्षकांना सुपरनॅचरल पॉवर पाहायला मिळणार आहेत. माझ्या पतीच्या प्रेमात एक मुलगी पडते आणि त्याला मिळवण्यासाठी ती काळ्या जादूचा वापर करते अशी या मालिकेची कथा आहे. ती त्याला मिळवण्यासाठी माझ्या शरीरात शिरते. यामुळे मी एकाचवेळी माझी आणि त्या मुलीची म्हणजेच मंजुलिकाची व्यक्तिरेखा साकारत आहे. त्यामुळे या मालिकेतील व्यक्तिरेखा ही माझ्यासाठी आव्हानात्मक आहे. मी नेहमी साकारत असलेल्या भूमिकेपेक्षा ही भूमिका खूप वेगळी असल्याने मी ही साकारू शकेन का याची मला खात्री नव्हती. पण एकताने माझ्यावर विश्वास ठेवल्याने मी ही भूमिका साकारत आहे. 
तू स्वतः सुपरनॅचरल पॉवरवर विश्वास ठेवतेस का?
या मालिकेत माझी व्यक्तिरेखा अशा कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवत नाही असे दाखवण्यात आले आहे. आणि माझ्या खऱया आयुष्यातही मी अशा कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. काळी जादू ही गोष्ट असते असे मी अनेकांकडून ऐकले आहे. जोपर्यंत मी स्वतः कोणत्याही गोष्टी स्वतःहून अनुभवत नाही, तोपर्यंत मी त्यावर विश्वास ठेवणार नाही.
तू आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या मालिकांमध्ये काम केले आहे. तुला स्वतःला कोणत्या प्रकारच्या मालिकेमध्ये काम करायला आवडेल?
साँस-बहूच्या मालिका प्रेक्षकांना पूर्वी आवडत होत्या. पण आता त्यांना या मालिकांमध्ये तितकासा रस राहिलेला नाही. त्यामुळे प्रेक्षकांच्या आवडीनुसार आपणही आपल्यात बदल करणे गरजेचे आहे असे मला वाटते. त्यामुळे मी नेहमीच वेगवेगळ्या भूमिका साकारते. जस्सी जैसी कोई नही या मालिकेत मी थोडीशी कॉमिक छटाही साकारली होती. पण भविष्यात तशी कोणतीच भूमिका साकारायला मिळाली नाही. या मालिकेत माझी आणि गौरव गेराची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. आजही मी आणि गौरव खूप चांगले फ्रेंडस आहोत. आम्ही वेळात वेळ काढून एकमेकांना भेटत असतो. आम्ही दोघे मॅड व्हिडीओ बनवून सोशल नेटवर्किंगवर अपलोड करत असतो. मला भविष्यात एखादी कॉमिक भूमिका साकारण्याची इच्छा आहे. लोकांना खळखळून हसवण्याची माझी इच्छा आहे. 
तुझी याआधीची प्यार को हो जाने दो ही मालिका फ्लॉप गेली होती. तुझ्या कारकीर्दीतील ती एकमेव फ्लॉप मालिका ठरली आहे. याविषयी काय सांगशील?
ही मालिका मी स्वीकारली, तेव्हा या मालिकेचे कथानक मला खूप आवडले होते. एक कलाकार म्हणून माझी या मालिकेतील भूमिकाही खूप छान होती. सगळे काही चांगले असताना ही मालिका का फ्लॉप ठरली हे आम्हाला कोणालाच कळले नाही. प्रसिद्ध कलाकारांचे चित्रपटही बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरतात. यशासोबत अपयशही चाखले पाहिजे असे मला वाटते.
कवच... काली शक्तियों से या मालिकेत तुझ्यासोबत विवेक दहिया आणि महेक चहल काम करत आहेत. विवेक पहिल्यांदाच प्रमुख भूमिका साकारत आहे तर महेकची ही पहिलीच मालिका आहे. तू या दोघांना एक सिनियर म्हणून काय मार्गदर्शन देतेस?
एक कलाकार म्हणून आपण रोज शिकत असतो. त्यामुळे मला सर्व काही येते असे मी कधीच समजत नाही. मी सिनियर आहे असे मला आजही वाटत नाही. कारण मला अजूनही खूप काही शिकायचे आहे. पण सहकलाकार म्हणून त्यांना काही शंका असेल तर त्यांना नक्कीच मदत करते. आम्ही तिघे चित्रीकरणाच्या दरम्यान खूप धमालमस्ती करतो. महेक आणि मी दोघेही पंजाबी असल्याने आम्ही चित्रीकरणाच्या दरम्यान पंजाबीत गप्पा मारतो. अनेक वेळा तर इतरांना भाषा येत नसल्याने ते आमच्याकडे केवळ पाहात असतात. महेकचे हिंदी तितकेसे चांगले नसल्याने सध्या हिंदी सुधरवण्यासाठी मी तिला मदत करत आहे. विवेकला तर मी चित्रीकरणाच्यावेळी खूप सतावते. आम्ही काही दिवसांपूर्वी गोरेगोव फिल्मसिटीला रात्रीच्या वेळी चित्रीकरण करत होतो. त्यावेळी मी एक प्लास्टिकचा कोळी घेऊन आली होती आणि चित्रीकरण सुरू झाल्यावर लगेचच त्याच्या अंगावर तो सोडून दिला होता. तो वेड्यासारखा ओरडला होता आणि मी मोठ्या मोठ्याने हसले होते. याचा बदला तो लवकरच घेणार असल्याचे त्याने मला सांगितले आहे. 
झलक दिखला जाचे विजेतेपद तू मिळवले होते. पण सध्या तू रिअॅलिटी शोपासून दूर आहेस, याचे काही कारण आहे का?
मालिकांमध्ये व्यग्र असल्याने मी रिअॅलिटी शो करत नव्हती. पण एखादी चांगली ऑफर आली तर रिअॅलिटी शो करण्याचा माझा विचार आहे. झलक दिखला जा या कार्यक्रमात माझ्यातील नृत्य कौशल्य प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. पण माझ्या नृत्याला वाव देणाऱया भूमिका मला भविष्यात मिळाल्या नाहीत. या मालिकेत मला नाचायला मिळेल अशी मी अपेक्षा करत आहे. 

Web Title: The comedy role of Mona Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.