​अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेचे 500 भाग पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2017 10:44 AM2017-02-08T10:44:26+5:302017-02-08T16:14:26+5:30

यश-जुईची प्रेमकथा प्रेक्षकांना अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेतील यश आणि जुईची केमिस्ट्री प्रेक्षकांना ...

Complete 500 episodes of the Oscars | ​अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेचे 500 भाग पूर्ण

​अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेचे 500 भाग पूर्ण

googlenewsNext
-जुईची प्रेमकथा प्रेक्षकांना अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेतील यश आणि जुईची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. आजपर्यंत रसिकांनी यश आणि जुईला भरभरून प्रेम दिले आहे. प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामुळेच आज अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेने 500 भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. या मालिकेचे 500 भाग 13 फेब्रुवारीला पूर्ण होणार आहेत. 
यश-जुईने आतापर्यंत त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. दहा बाय दहाच्या छोट्याशा घरात हे जोडपे आपल्या कुटुंबियांसह अतिशय आनंदाने राहात असल्याचे दाखवण्यात आले आहे. 
जुई आपले घर आणि करियर ही तारेवरची कसरत करताना आपल्याला पाहायला मिळते. या पाचशे भागात प्रेक्षकांना अनेक गोष्टी अनुभवायला मिळाल्या. यश आणि जुईचे फुललेले प्रेमप्रकरण, गैरसमजातून झालेली भांडणे या गोष्टींनी प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. तसेच कोणत्याही संकटात जीवाला जीव देणारी, आपुलकी जपणारी सुरेख सासरची मंडळी या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाली. 
यश आणि जुईचे कुटुंब पाहाताना हे कुटुंब आपल्या कुटुंबासारखेच असल्याचे प्रेक्षकांना जाणवले. नात्यांमधील आपुलकी जपणाऱ्या या मालिकेचे आता 500 भाग पूर्ण होणार आहेत. 
अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेचे 500 भाग पूर्ण झाल्यानंतर या मालिकेच्या कथानकाला अनेक वळणे मिळणार असून ही मालिका अधिकच उत्कंठावर्धक वळणावर पोहोचणार आहे. या मालिकेत प्रेक्षकांना पुढील भागांमध्ये काय पाहायला मिळणार याची त्यांना उत्सुकता लागलेली आहे. या मालिकेत संतोष जुवेकर, मृणाल दुसानिस यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यां दोघांच्या अभिनयाचे सध्या सगळेच कौतुक करत आहेत. 

Web Title: Complete 500 episodes of the Oscars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.