Confirm : बिग बॉसच्या ग्रॅण्डफिनालेला स्वामी ओम राहणार उपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2017 04:33 PM2017-01-19T16:33:05+5:302017-01-19T16:33:43+5:30
बिग बॉस सिझन - १० चा सर्वाधिक वादग्रस्त स्पर्धक स्वामी ओम शोच्या ग्रॅण्डफिनालेला उपस्थित राहणार असल्याचे जवळपास निश्चित झाले ...
ब ग बॉस सिझन - १० चा सर्वाधिक वादग्रस्त स्पर्धक स्वामी ओम शोच्या ग्रॅण्डफिनालेला उपस्थित राहणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. शोमध्येच नव्हे तर कलर्स चॅनेलवरही दिसू देणार नसल्याचे खडसावून सांगणाºया सलमान खान हा मात्र स्वामी ओमच्या उपस्थितीमुळे चांगलाच दु:खावणार आहे. सलमानच्या आदेशाविरुद्ध शोच्या निर्मात्यांनी स्वामी ओमला ग्रॅण्डफिनालेमध्ये बोलविण्याचा पवित्रा घेतल्याने येत्या काळात बिग बॉसचे निर्माते विरुद्ध सलमान खान असा सामना रंगण्याची शक्यता आहे.
बिग बॉस सिझनमध्ये वादग्रस्त ठरलेल्या स्वामी ओमला घरातील गलिच्छ वर्तणुकीमुळे धक्के मारून घराबाहेर काढण्यात आले होते. घराबाहेर काढल्यानंतर बेताल वक्तव्य करीत स्वामी ओमने ग्रॅण्डफिनालेमध्ये न बोलाविल्यास बिग बॉसच्या घराला आग लावणार असल्याची धमकी दिली होती. त्याचबरोबर शोचा होस्ट सलमान खान हा ‘आयएसआय एजंट’ असून, त्याला ग्रॅण्डफिनालेमध्ये मारणार असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याचबरोबर हा शो भारतीय संस्कृतीला घातक असून, घरात राहणाºयांना ड्रग्ज पुरविले जात असल्याचेही बेताल वक्तव्य केले होते.
त्यामुळे भविष्यात स्वामी ओमला या शोमध्ये एण्ट्री दिली जाणार नाही हे जवळपास निश्चित समजले जात होते. मात्र आता आलेल्या माहितीनुसार स्वामी ओम ग्रॅण्डफिनालेमध्ये उपस्थित राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे सलमानही स्वामी ओमचे काहीच करू शकत नाही, असा प्रचार आता स्वामी ओमच्या समर्थकांकडून केला जात आहे. दरम्यान, यावर अद्यापपर्यंत सलमान खान याची प्रतिक्रिया आली नसल्याने पुढच्या काळात नेमके काय घडू शकेल याचा कयास लावणे अवघड झाले आहे.
त्याचबरोबर घराबाहेर पडल्यानंतर बिग बॉस शोच्या निर्मात्यांना उघडपणे धमकी देणाºया स्वामी ओमला निर्माते घाबरले तर नसावेत ना, असा सूर व्यक्त केला जात आहे. तसेच स्वामी ओम फिनालेला उपस्थित राहणार असल्याने सलमान खान फिनालेला होस्ट करणार की नाही, अशी शंकाही उपस्थित केली जात आहे.