नवीन टास्क खेळताना स्पर्धक प्रमाणाबाहेर आक्रमक! बिग बॉसने सुनावली ही मोठी शिक्षा, सर्वांना धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 17:52 IST2024-09-03T17:50:59+5:302024-09-03T17:52:11+5:30
बिग बॉसच्या नवीन टास्कमध्ये सदस्य आक्रमक होणार असून बिग बॉसने सर्वांना मोठी शिक्षा आहे (bigg boss marathi 5)

नवीन टास्क खेळताना स्पर्धक प्रमाणाबाहेर आक्रमक! बिग बॉसने सुनावली ही मोठी शिक्षा, सर्वांना धक्का
'बिग बॉस मराठी'च्या घरात नेहमीच रंगतदार टास्क पार पडत असतात. सदस्यांसाठी प्रत्येत आठवड्यात बिग बॉसच्या टीमकडून वेगवेगळे टास्क डिझाईन केले असतात. प्रत्येक आठवड्यातील टास्कमध्ये सदस्य जीव तोडून खेळत असतात. टास्क जिंकण्यासाठी वाट्टेल ते करण्याची सदस्यांची तयारी असते. रितेशभाऊने सांगितल्याने हा आठवडा खूपच कठीण आहे. या आठवड्यात घरात अनेक कठीण टास्क पार पडणार आहेत. अशातच आज 'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्य BB फार्मचा कारभार सांभाळणार आहेत.
टास्कमध्ये सदस्य झाले आक्रमक, मिळाली शिक्षा
'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोमध्ये घरातील सदस्य BB फार्मचा कारभार सांभाळताना दिसत आहेत. वैभव, अरबाज, सूरज, जान्हवी, घन:श्याम, निक्की, आर्यासह अनेक सदस्य आक्रमकपणे टास्क खेळत आहे. त्यांचा आक्रमकपणा पाहून बिग बॉस सदस्यांना चांगलीच शिक्षा सुनावणार आहेत. प्रोमोमध्ये 'बिग बॉस' म्हणत आहेत,"आक्रमकतेची शिक्षा म्हणून दोन्ही टीममधील एका सदस्याला बाद करण्यात येत आहे". हे ऐकताच निक्की तांबोळीला चांगलाच धक्का बसलेला दिसतो.
कोणते सदस्य होणार बाद
'बिग बॉस मराठी'च्या आजच्या टास्कमधून दोन्ही टीममधले कोणते सदस्य बाद होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सदस्य बाद झाले तरीही BB फार्मचा कारभार सांभाळताना पाहून प्रेक्षकांचं मात्र चांगलंच मनोरंजन होणार आहे. बिग बॉसच्या या आठवड्यात एकाच दिवशी सात जण नॉमिनेट झाले आहेत. धनंजय, घनःश्याम, निक्की, सूरज, अभिजीत, आर्या आणि अरबाज हे सात सदस्य या आठवड्यात नॉमिनेट झाले आहेत.