बिग बॉस मराठीच्या स्पर्धकांना वाटतंय कॅप्टन विनीत भोंडेच्या डोक्यात गेली हवा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 09:53 AM2018-04-19T09:53:06+5:302018-04-19T15:23:06+5:30

कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या घरामधील पहिला कॅप्टन होण्याचा मान विनीत भोंडेला मिळाला. तो कॅप्टन झाल्यापासून त्याच्या वागणुकीमध्ये काही बदल ...

Contestants of Big Boss Marathi felt Captain Vineet Bhonde on the head | बिग बॉस मराठीच्या स्पर्धकांना वाटतंय कॅप्टन विनीत भोंडेच्या डोक्यात गेली हवा

बिग बॉस मराठीच्या स्पर्धकांना वाटतंय कॅप्टन विनीत भोंडेच्या डोक्यात गेली हवा

googlenewsNext
र्स मराठीवरील बिग बॉसच्या घरामधील पहिला कॅप्टन होण्याचा मान विनीत भोंडेला मिळाला. तो कॅप्टन झाल्यापासून त्याच्या वागणुकीमध्ये काही बदल झालेला आहे. हा बदल घरातील रहिवाशी संघाला प्रकर्षाने जाणवू लागला आहे. विनीतच्या बोलण्यात एक प्रकारची गुर्मी आल्याचे सगळ्यांना जाणवत आहे. तसेच तो उर्मटपणे बोलत असल्याचे अनेकांना वाटू लादली आगे. तसेच काही रहिवाशांना हा त्याचा बालिशपणा वाटत आहे. विनीतचे प्रत्येक वेळेला बिग बॉसकडे जाऊन छोट्या–छोट्या गोष्टींची मागणी करणे, कॅप्टन असल्याने घरातील इतर सदस्यांना कामे सांगणे, सारखी टीम मीटिंग आयोजित करणे, मुद्दा सांगण्यात स्पष्टता नसणे अशा प्रकारच्या अडचणी बिग बॉसच्या घरातील रहिवाशी सहन करत आहेत.
बिग बॉस मराठीच्या घराचा पहिला कॅप्टन झाल्यानंतर विनीतच्या बोलण्यामध्ये आलेला फरक घरातील सदस्यांना खटकत आहे. विनीत भोंडेला वारंवार आस्ताद काळे आणि राजेश शृंगारपुरे यांनी त्याच्या वागणुकीमध्ये लवकरात लवकर बदल करावा हे समजवण्याचा प्रयत्न केला आहे. अनिल थत्ते यांनी विनीत भोंडेचा संपूर्ण टीम समोर पाणउतारा केला. अनिल थत्ते आपले मनोगत व्यक्त करत असताना विनीतने त्यांना दोनदा थांबवले, ज्याचा त्यांना खूप राग आला. तसेच अचानक कॅप्टन झाल्यामुळे विनीतच्या डोक्यात हवा गेली आहे, त्याला वरिष्ठांशी कसे बोलावे हे देखील कळत नाही असे घरच्यांचे म्हणणे आहे.
तर दुसरीकडे बिग बॉस घरातील नॉमिनेट सदस्यांसाठी प्रार्थना यज्ञ या कार्याची घोषणा बिग बॉसने केली होती, नॉमिनेट सदस्यांना सदइच्छा देण्यासाठी हा यज्ञ आयोजित केला. हा टास्क रात्रभर चालला. आस्ताद काळेने हा टास्क उत्तमरीत्या पार पाडून बाजी मारली, त्याच्या बरोबर पुष्कर जोग, भूषण कडू याने देखील चांगल्या प्रकारे हा टास्क पार पाडला. टास्क रात्रभर चालल्यामुळे जे सदस्य रात्रभर यज्ञ कुंडाच्या जवळ बसले होते, त्यांना पूर्ण दिवस झोप मिळालेली नाही. त्यामुळे त्यांची चिडचिड होणे अगदीच साहाजिकच होते. आस्ताद काळे, भूषण कडू जवळपास संपूर्ण दिवस झोपले नव्हते, त्यांच्यासोबत पुष्कर देखील जागत होता. हा पहिला टीम टास्क असल्याकारणाने तो यशस्वीरीत्या पूर्ण करणे महत्त्वाचे होते. या टीम टास्क दरम्यान आस्ताद काळे संपूर्ण रहिवाशी संघावर प्रचंड नाराज असल्याचे दिसून आले. या टास्कच्या संदर्भात झालेल्या चर्चेमध्ये आस्ताद काळेने केलेल्या आरोपामुळे मेघाला खूपच वाईट वाटले आणि तिला रडू कोसळले. कारण आस्तादचे म्हणणे होते की, मेघाने आम्हाला प्रोत्साहन न देता ती निघून गेली. आस्तादने मेघावर नव्हे तर संपूर्ण टीम वर आपली नाराजी व्यक्त केली.

Also Read : बिग बॉस मराठीतील या स्पर्धकाला मिळते सगळ्यात जास्त मानधन

Web Title: Contestants of Big Boss Marathi felt Captain Vineet Bhonde on the head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.