Corona Effect: लॉक्डडाऊनचा या मराठी अभिनेत्रीला फायदाच, दिवस रात्र सुरु असतो रोमान्स, फोटोच देतायेत साक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 16:30 IST2020-03-23T16:30:29+5:302020-03-23T16:30:51+5:30
कोरोना व्हायरसमुळे देशातील सर्व लोक घरात बंद आहेत. लोक आपल्या बचावासाठी सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळत आहेत.

Corona Effect: लॉक्डडाऊनचा या मराठी अभिनेत्रीला फायदाच, दिवस रात्र सुरु असतो रोमान्स, फोटोच देतायेत साक्ष
कलाकार मंडळींच्या खासगी जीवनाविषयी रसिकांना जाणून घेण्याची इच्छा असते. त्यांच्या जीवनातील लहानसहान गोष्टी जाणून घ्यायला रसिक आतुर असतात. कलाकार मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून रसिकांशी संवाद साधतात. आपल्या जीवनातील गोष्टी, फोटो ते सोशल मीडियावर शेअर करतात. नुकतंच शनाया फेम अभिनेत्री ईशा केसकर हिनं तिच्या जीवनातील खास व्यक्तीसह तिचा फोटो सोशल मीडियाद्वारे फॅन्ससह शेअर केला आहे. ईशाच्या जीवनातील खास व्यक्ती म्हणजे अभिनेता ऋषी सक्सेना, सध्या कोरोनाने सर्वत्रच थैमान घातले आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉक्डडाऊन करण्यात आले आहे.
कोरोना व्हायरसमुळे देशातील सर्व लोक घरात बंद आहेत. लोक आपल्या बचावासाठी सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळत आहेत. ते स्वतःला स्वतःच्या घरात सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. यादरम्यान सेलिब्रेटी घरात राहून आपला वेळ व्यतित करत आहेत.
कलाकारांच्याही शूटिंग बंद झाल्यामुळे त्यांनाही घरी आपल्या कुटुंबियांना देण्यासाठी बराच वेळ मिळालेला आहे. एरव्ही शूटिंगमुळे त्यांना हवा तसा वेळ कुटुंबियांसोबत घालवता येत नाही. त्यामुळे कोरोनामुळे सध्या सगळेच सेलिब्रेटी घरी आहेत. अशातच ईशाही बॉयफ्रेंड ऋषीसह आपला क्वॉलिटी टाईम घालवत असल्याचे पाहायला मिळत आहे. इतकेच नाहीतर ती सध्या दोघांचे रोमांटीक फोटो शेअर करण्यातच जास्त बिझी दिसत आहे.
ईशाने गेल्या काही दिवसांपासून त्यांचे रोमांटीक फोटो शेअर करण्याचा जणू सपाटाच लावला आहे. ऋषी आणि ईशा दोघे कशाप्रकारे सध्या वेळ घालवत आहेत हे त्यांच्या इन्स्टापेजवर नजर टाकल्यास तुमच्या लक्षात येईलच.