लॉकडाऊनदरम्यान शिकारी फेम या गोष्टी करत घालवते वेळ, एकदा पाहाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 11:56 IST2020-04-15T11:55:50+5:302020-04-15T11:56:35+5:30
लॉकडाउनमुळे तिही घरात आहे आणि तिचा हा छंद जोपासत आहे. याच निमित्ताने तिला स्केचिंगची किती आवड आहे हे ही तिच्या चाहत्यांना समजलं आहे.

लॉकडाऊनदरम्यान शिकारी फेम या गोष्टी करत घालवते वेळ, एकदा पाहाच
कोरोना व्हायरसचा देशातच नाही तर जगभरात सुळसुळाट झालेला आहे. त्यातच देशात लॉकडाउनमुळे सगळे घरी आहेत. मात्र मिळालेल्या या वेळेत करायचं काय असा प्रश्न जरी पडत असला तरी याचं उत्तर या वेळेतच सापडतंय. या वेळेत बहुतांश लोक त्यांचे छंद जोपासत आहेत. बरेच सेलिब्रिटी या वेळेचा पुरेपूर उपयोग करीत आहेत आणि स्वयंपाकाची हौस पुरी करत आहेत.
'युवा डान्सिंग क्विन'ची धडाकेबाज स्पर्धक नेहा खान काही तरी वेगळं करते आहे. 'आपण राहिलो घरी, तर कोरोना जाईल माघारी' हे सर्व सेलिब्रिटी मंडळी सुद्धा पाळताना दिसत आहेत. आपल्या अभिनय आणि नृत्याने नेहानी सर्वांची मनं जिंकली आहेत. नेहाला आधीपासूनच नृत्याची आवड आहे. 'युवा डान्सिंग क्विन'मध्ये तिच्या डान्सचं कौतुक होत आहे. लॉकडाऊनमध्ये नेहाचा एक वेगळाच पैलू तिच्या चाहत्यांना पाहायला मिळतोय. नेहा खानला स्केचिंगची आवड आहे. लॉकडाउनमुळे तिही घरात आहे आणि तिचा हा छंद जोपासत आहे. याच निमित्ताने तिला स्केचिंगची किती आवड आहे हे ही तिच्या चाहत्यांना समजलं आहे.
नेहाने बऱ्याच वर्षांनी पुन्हा स्केचिंगला सुरुवात केली आहे. शिवाय नुकतच तिनं स्वत:चं आणि तिच्या आईचं चित्र रेखाटलं आहे. त्याचा व्हिडीओही तिने पोस्ट केला आहे. नेहमीच चित्रीकरणामुळे कलाकारांना घरात वेळ घालवायला मिळत नाही, परंतु आता घरात राहून खूप साऱ्या अॅक्टिव्हिटिज करत कलाकारा मंडळी स्वतःचा वेळ आनंदाने घालवत असल्याचे पाहायला मिळत आहेत.