Gautami Deshpande Corona Positive: 'माझा होशील ना' फेम अभिनेत्री गौतमी देशपांडेला कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 17:35 IST2022-01-13T17:34:53+5:302022-01-13T17:35:17+5:30
टेलिव्हिजन मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री गौतमी देशपांडे (Gautami Deshpande Corona Positive) हिला कोरोनाची लागण झाली आहे. तिनं इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याची माहिती दिली आहे.

Gautami Deshpande Corona Positive: 'माझा होशील ना' फेम अभिनेत्री गौतमी देशपांडेला कोरोनाची लागण
मुंबई-
देशभरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असून रुग्णसंख्येत महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे. यातच अनेक कलाकार देखील कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. टेलिव्हिजन मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री गौतमी देशपांडे (Gautami Deshpande Corona Positive) हिला कोरोनाची लागण झाली आहे. तिनं इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याची माहिती दिली आहे.
इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून गौतमीनं तिला कोरोनाची लागण झाल्याची माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे. "कोरोना विरोधी लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही मला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाला हलक्यात घेऊ नका. हा काळ कठीण आहे. त्यामुळे घराबाहेर पडू नका. घरी राहा, सुरक्षित राहा", असं गौतमीनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसंच "लस घ्या. मला मान्य आहे की लस घेऊनही कोरोनाची लागण होत आहे. पण लस घेतलेल्यांना कोरोनाचा त्रास कमी जाणवतोय. त्यामुळे लवकरात लवकर लस घ्या. स्वत:ची आणि कुटुंबीयांची काळजी घ्या. घरी रहा सुरक्षित रहा", असंही गौतमीनं म्हटलं आहे.
गौतमी देशपांडे हिला टेलिव्हिजन वाहिनीवरील ''माझा होशील ना'' मालिकेतून ओळख मिळाली. मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती आणि यामाध्यमातून गौतमी घराघरात पोहोचली. मालिकेचं दुसरं पर्व येणार असल्याचीही चर्चा सध्या सोशल मीडियात सुरू आहे.