CoronaVirus : 'ह.म. बने तु.म. बने'मधील हा पठ्ठ्या लॉकडाउनमध्ये करतोय शेती, Video पाहून कराल कौतूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 07:00 AM2020-03-31T07:00:00+5:302020-03-31T07:00:00+5:30

शेती करण्याची आवड आणि त्याचा निरागसपणा पाहून या अल्लड मनाचे कौतुक करावे तितके कमीच आहे.

CoronaVirus: 'Hum Bane Tum Bane Serial child artist Kedar Aagskar farming in lockdown tjl | CoronaVirus : 'ह.म. बने तु.म. बने'मधील हा पठ्ठ्या लॉकडाउनमध्ये करतोय शेती, Video पाहून कराल कौतूक

CoronaVirus : 'ह.म. बने तु.म. बने'मधील हा पठ्ठ्या लॉकडाउनमध्ये करतोय शेती, Video पाहून कराल कौतूक

googlenewsNext

 कोरोना व्हायरसचा वाढता प्रार्दुभाव पाहता 21 दिवसांसाठी लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे सामान्यांसोबत सेलिब्रेटीदेखील घरातच आहेत. यासोबतच या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळ्यात आधी बंद झाल्या त्या शाळा. नंतर हळूहळू बाहेर पडणं बंद झालं. त्यामुळे या मुलांकडे घरात बसून खेळण्याशिवाय काही पर्याय उरला नाही. पण तुम्ही नीट निरीक्षण करून पाहा ही मुले अजून काही कंटाळली नसतील. त्यांना रोज काहीनाकाही नवीन कल्पना नक्कीच सुचत असतील. लहान मुलं म्हणजे विविध क्लृप्त्यांनी भरलेलं भांडार आणि त्यात आजकालची पिढी ही खूप प्रगत आहे. असाच आहे आपला पार्थ बने.


लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे सध्या चित्रपट आणि मालिका यांचे चित्रीकरण बंद ठेवण्यात आले आहे आणि अशा वेळी सोनी मराठीवरील 'ह.म. बने तु.म. बने' मालिकेतील लहान सदस्य पार्थ बने उर्फ केदार आगस्कर त्याचा क्वारंटाईन वेळ शेती करण्यात घालवतोय.

या चिमुकल्या केदारने घरी राहून त्याच्या घराच्या बागेत मेथी, छोले, टोमॅटो, वांगी, चवळी या भाज्यांची शेती केली आहे. कोणती भाजी तयार झाली आहे आणि कोणती भाजी अजूनही लहान आणि कोवळी आहे याचे ज्ञानदेखील केदारला आहे.
केदार आगास्करने त्याच्या शेतीमध्ये फेरफटका मारणारा व्हिडिओ सोनी मराठी वाहिनीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यात तो इतक्या गोड अंदाजात त्याने केलेल्या शेतीबद्दल सांगतो आहे.


 शेती करण्याची आवड आणि त्याचा निरागसपणा पाहून या अल्लड मनाचे कौतुक करावे तितके कमीच अशी भावना प्रेक्षकांच्या मनात नक्कीच येईल.

Web Title: CoronaVirus: 'Hum Bane Tum Bane Serial child artist Kedar Aagskar farming in lockdown tjl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.