CoronaVirus: 'रात्रीस खेळ चाले'मधील पांडू उर्फ प्रल्हाद कुडतरकरने केले प्रेक्षकांना हे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 02:14 PM2020-04-03T14:14:43+5:302020-04-03T14:15:49+5:30

पांडू म्हणजेच अभिनेता प्रल्हाद कुडतरकरने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आपल्या चाहत्यांना आवाहन केले आहे.

CoronaVirus: Ratris Khel Chaale Fame Pandu alias Prahlad Kudtarkar appeals to the audience | CoronaVirus: 'रात्रीस खेळ चाले'मधील पांडू उर्फ प्रल्हाद कुडतरकरने केले प्रेक्षकांना हे आवाहन

CoronaVirus: 'रात्रीस खेळ चाले'मधील पांडू उर्फ प्रल्हाद कुडतरकरने केले प्रेक्षकांना हे आवाहन

googlenewsNext

इसारलंय, त्या माका काय माहित?", हे डायलॉग सगळ्यांच्या ओठांवर रुळले आहेत. ज्याच्यामुळे हे  डायलॉग्स लोकप्रिय झाले आहेत त्या रात्रीस खेळ चाले या लोकप्रिय मालिकेतील पांडू या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. पांडू म्हणजेच अभिनेता प्रल्हाद कुडतरकरने आपल्या चाहत्यांना क्वारंटाईनमध्ये सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.

कोरोना या विषाणूने अख्ख्या जगाला ग्रासलं आहे. संपूर्ण जग या संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतंय. अशावेळी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केलं आहे. पण आपण या लॉकडाऊनकडे सकारात्मक दृष्टीने पाहूया. कारण जग आता जरी थांबलं असलं तरी ते लॉकडाऊन नंतर पाळणार आहे आणि अधिक वेगाने पाळणार आहे. लॉक डाऊन म्हणजे नजरकैद नसून सरकारने आपली घेतलेली काळजी असल्याचं प्रल्हादने सांगितलं.

तो पुढे म्हणाला की, भाजी किंवा अन्नधान्य आणण्यासाठी अनेक ठिकाणी अजूनही गर्दी करतात आहेत आणि गर्दीतच कोरोना आघात करतोय. म्हणून माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे कि सरकारने आपल्यावर नियम लादले नाही आहेत पण आपण एक सुजाण नागरिक म्हणून त्या नियमांची अंमलबजावणी करूया. गर्दी टाळूया. घरात राहूया
इतकंच नाही तर प्रल्हाद आणि काही मराठी कलाकारांनी मिळून प्रेक्षकांमध्ये जनजागृती करणारा मालवणी भाषेत एक व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. 


राज्यातील जनता हा लॉकडाऊन नक्की यशस्वी करेल याची मला खात्री आहे. म्हणजे थांबलेलं हे जग, थांबलेले आपण पुन्हा एकदा या लॉकडाऊन नंतर वेगवान पळू. पण त्यासाठी आता घरीच राहून एकमेकांची काळजी घ्या, असे आवाहनही यावेळी प्रल्हादने केले.

Web Title: CoronaVirus: Ratris Khel Chaale Fame Pandu alias Prahlad Kudtarkar appeals to the audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.