Tunisha Sharma: आत्महत्या की..., तुनिषा शर्माचा मृत्यू कसा झाला? पोस्टमार्टेम रिपोर्ट आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 12:01 PM2022-12-25T12:01:36+5:302022-12-25T14:57:24+5:30
Tunisha Sharma : तुनिषा शर्मा हिने आत्महत्याच केली का की तिचा घातपात झाला. याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, तुनिषा शर्माचे पोस्टमार्टेम मुंबईतील जे जे रुग्णालयामध्ये झाले. त्यानंतर आता पोस्टमार्टेमचा रिपोर्ट समोर आला आहे.
युवा अभिनेत्री तुनिषा शर्मा हिच्या मृत्युमुळे मनोरंजन जगताला धक्का बसला आहे. तुनिषा हिने तिच्या शो च्या सेटवरच गळफास लावून आत्महत्या केली. त्यामुळे खळबळ उडाली आहे. तिच्या आत्महत्येमागे काय कारण आहे. तिने आत्महत्याच केली का की तिचा घातपात झाला. याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, तुनिषा शर्माचे पोस्टमार्टेम मुंबईतील जे जे रुग्णालयामध्ये झाले. त्यानंतर आता पोस्टमार्टेमचा रिपोर्ट समोर आला आहे.
पोस्टमार्टेमच्या रिपोर्टनुसार तुनिशा शर्माचा मृत्यू हा श्वास गुदमरल्यामुळे झाला आहे. गळफास लावल्यानंतर श्वास गुदमरल्याने तुनिषा हिचा मृत्यू झाला. तिच्या शरीरावर अन्य कुठल्याही प्रकारच्या जखमांच्या खुणा आढळलेल्या नाहीत. तुनिषा हिने आत्महत्या केल्यानंतर ती गर्भवती असल्याच्या अफवा उडाल्या होत्या. मात्र ती गर्भवती असल्याची बाब पोलीस सूत्रांनी फेटाळून लावली आहे.
दरम्यान, तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर तुनिशाच्या आईने अभिनेता शिझान खानवर गंभीर आरोप केले आहे. शिझानला कंटाळून तुनिषाने आत्महत्या केल्याचा आरोप तुनिषाच्या आईने केला आहे. आईच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
शिझान खान कोण आहे ?
शिझान खानचा जन्म मुंबईत ९ सप्टेंबर १९९४ रोजी झाला. शिझान महाराष्ट्रातील मुस्लिम परिवारातला मुलगा. त्याने मुंबई विद्यापिठातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. तो एक मॉडेल आणि अभिनेता आहे. शिझानने खूप कमी वयात अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. जोधा अकबर या मालिकेत त्याने अकबरच्या बालपणीची भुमिका साकारली होती. शीजानने तुनिषासोबत 'अली बाबा दास्तान ए काबुल' या मालिकेत मुख्य भुमिका केली होती. शिझानच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर तुनिषासोबत अनेक फोटो आहेत. या फोटो, व्हिडिओ वरुन असे वाटते की त्यांच्यात चांगले नाते होते. शिझान फिटनेसबाबतीतही खूप जागरुक आहे.