स्टारकिडसोबत लग्न करण्यासाठी अभिनेत्याने केली बायकोची फसवणूक; मुलींनाही सोडलं वाऱ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 14:42 IST2024-01-30T14:41:36+5:302024-01-30T14:42:02+5:30
Tv actor: जुहीसोबत लग्न करण्यासाठी या अभिनेत्याने त्याचा ११ वर्षांचा संसार मोडला

स्टारकिडसोबत लग्न करण्यासाठी अभिनेत्याने केली बायकोची फसवणूक; मुलींनाही सोडलं वाऱ्यावर
छोट्या पडद्यावर अनूप सोनी हे नाव नवीन नाही. 'बालिका वधू', 'क्राइम पेट्रोल' अशा अनेक मालिकांमधून त्याने आपला ठसा उमटवला आहे. त्यामुळे आज लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत त्याचं नाव घेतलं जातं. अनूप सोनीचं प्रोफेशनल लाइफ साऱ्यांनाच ठावूक आहे.मात्र, त्याच्या पर्सनल आयुष्याविषयी फारसं कोणाला ठावूक नाही. अनूपने एका स्टारकिडसोबत लग्न करण्यासाठी त्याच्या पहिल्या पत्नीची फसवणूक केली. इतकंच नाही तर त्याने त्याच्या मुलींकडेही दुर्लक्ष केल्याचं म्हटलं जातं
अनूपने अभिनेता राज बब्बर यांच्या लेकीसोबत जुही बब्बरसोबत दुसरा संसार थाटला आहे. यापूर्वी त्याने रितू सोनी हिच्यासोबत लग्न केलं होतं. विशेष म्हणजे जवळपास ११ वर्ष संसार केल्यानंतर तो रितूपासून विभक्त झाला.
कशी झाली अनुप-जुहीची भेट
अनुप आणि जुही यांचं घर जवळजवळ होतं. शिवाय ते दोघंही थिएटरमध्ये काम करायचे. इथेच त्यांची पहिली ओळख झाली आणि मग पुढे मैत्री वाढली. विशेष म्हणजे दोघंही विवाहित असतानाही ते एकमेकांच्या प्रेमात पडले. जुहीला डेट करत असलेल्या अनुपचं लग्न रितूसोबत झालं होतं. रितू सॉफ्टवेअर इंजिनिअर असून त्यांना दोन मुली सुद्धा होत्या.
जुहीसाठी मोडला ११ वर्षांचा संसार, पत्नीचे केली फसवणूक
अनुप आणि रितू यांनी जवळपास ११ वर्ष संसार केला. मात्र, जुही आयुष्यात आल्यानंतर त्याने रितूपासून दुरावा निर्माण करण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर अनुप, जुहीसोबत लिव्ह इनमध्ये रहात होता याची कल्पनाही रितूला नव्हती.
दरम्यान, अनुपच्या कॉल डिटेल्समधून रितूला सत्य समजलं. त्यानंतर तिने २०१० मध्ये अनुपपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. रितूला घटस्फोट दिल्यानंतर अनुपने २०११ मध्ये जुही बब्बरसोबत लग्न केलं. या जोडीला मुलगासुद्धा आहेत. सध्या अनुप, जुही आणि त्याच्या मुलासोबत राहतो. तर रितू तिच्या दोन मुलींसोबत एकटी राहते.