'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याचं आत्महत्येचं कारण समोर, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 11:02 IST2024-11-09T11:02:00+5:302024-11-09T11:02:39+5:30
३५ वर्षीय नितीनने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. आता त्याच्या आत्महत्येचं कारण समोर आलं आहे.

'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याचं आत्महत्येचं कारण समोर, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेता नितीन चौहानने आत्महत्या करत गुरुवारी(७ नोव्हेंबर) जीवन संपवलं. त्याच्या निधनाने चाहत्यांना आणि सेलिब्रिटींनाही मोठा धक्का बसला. ३५ वर्षीय नितीनने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. आता त्याच्या आत्महत्येचं कारण समोर आलं आहे.
दिंडोशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काम मिळत नसल्याने नितीन नैराश्यात होता. त्यातूनच त्याने हे टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवलं. गुरुवारी घरी कोणीच नसताना नितीनने गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दिंडोशी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक अजय आफळे म्हणाले, “प्राथमिक चौकशी दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार नितीन चौहानला गेल्या काही वर्षांपासून काम मिळत नव्हतं आणि त्यामुळे तो नैराश्यात होता.” नितीनच्या निधनामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
टेलिव्हिजनवरील अनेक मालिका आणि रिएलिटी शोमध्ये नितीनने काम केलं होतं. ‘दादागिरी सीझन २’ मध्ये तो दिसला होता. या शोचा तो विजेता होता. ‘क्राइम पेट्रोल’मध्येही त्याने काम केलं होतं. तर एमटीव्हीवरील ‘स्प्लिट्सविला’मध्येही तो सहभागी झाला होता.