बापमाणूसमध्ये दादासाहेब आणि शब्बीर यांचे नाते होणार अधिक दृढ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2018 08:18 AM2018-05-02T08:18:38+5:302018-05-03T09:32:32+5:30
रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या झी युवा या वाहिनीने अगदी कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. लोकप्रियतेचा शिखर गाठलेल्या ...
र िक प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या झी युवा या वाहिनीने अगदी कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. लोकप्रियतेचा शिखर गाठलेल्या बापमाणूस या मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली. घरातीलबापमाणसाची सत्ता आणि मान मिळवण्यासाठी चाललेल्या राजकारणावर आधारित या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. दादासाहेब आणि त्यांच्या मुलगा सूर्या ही दोन्ही पात्रं महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहेत.दादासाहेबांच्या मुलाचे पात्रं साकारणे आणि त्यांच्या सारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करणं ही खूप मोठी जबाबदारी आहे असे सुयश टिळक म्हणतात. गावाचे प्रमुख या नात्याने आपल्या प्रवासात दादासाहेबांना अनेकविरोधक असतात पण त्यांचा एक हक्काचा उजवा हात असतो तो म्हणजे शब्बीर. शब्बीर त्यांच्यासोबत सर्व चांगल्या- वाईट प्रसंगांमध्ये भक्कम भिंतीसारखा त्यांच्यासोबत असतो.
सध्या मालिकेत गीता आणि सूर्या यांच्यातील उमलत्या नात्याखेरीज दादासाहेब आणि शब्बीर यांच्यातील वाढत्या दृढसंबंधांवर देखील लक्ष केंद्रित केलं आहे. शब्बीरने दादासाहेबांना आधार दिला नसता तर ते आज जिथे आहेत तिथेपोहोचू शकले नसते. शब्बीर मुस्लिम असला तरी देखील, दादासाहेब त्याला कुटुंबातील एक सदस्यच मानतात. दादासाहेब शब्बीरला त्याच्या अडचणीच्या काळात आधार देतात आणि म्हणून शब्बीर त्यांची बाजू कधीही नसोडण्याची शपथ घेतो. गावकरी देखील शब्बीरला दादासाहेबांची सावली मानत सतात आणि शब्बीरचा देखील दावा असतो की आज तो जे काही आहे ते दादासाहेबांच्या मुळेच आहे.गावातील वाढत्या राजकारणाच्या दरम्यान, दादासाहेब आणि शब्बीर यांच्यातील नातं आहे तसंच राहील का? गीता आणि सूर्या एकमेकांच्या जवळ येत असताना, त्यांचं नातं कायमस्वरुपी होईल का?
बापमाणूस या मालिकेत रविंद्र मंकणी, सुयश टिळक, पल्लवी पाटील, संग्राम समेळ यांसारख्या कलाकारांच्या मुख्य भूमिका असून प्रेक्षकांना ही मालिका आणि मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रचंड आवडत आहेत. आता या मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे. या मालिकेला मिळालेल्या वळणानंतर मालिकेची कथा अधिक रंजक होणार आहे