माधुरी दीक्षितने दिला मदतीचा हात, शगुफ्ता अली यांना केली इतक्या लाखांची मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 12:30 PM2021-07-09T12:30:24+5:302021-07-09T12:37:35+5:30
टीव्ही मालिकेमधून प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री शगुफ्ता अली सध्या हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत. गेल्या चार वर्षापासून त्या बेरोजगार आहेत. संपूर्ण बचत संपली आहे त्यामुळे सध्या आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.
करिअर ऐन भरात असताना सेलिब्रिटींचं कौतुक होतं,प्रेम मिळतं. मात्र कालांतराने याच कलाकारांच्या उतारवयात किंवा पडत्या काळात कुणीच त्यांच्याकडे लक्षही देत नाही. अशी कित्येक उदाहरणं चित्रपटसृष्टीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून टीव्ही अभिनेत्री शगुफ्ता अली आर्थिक तंगीमुळे हलीखीचं जगणं जगत असल्याचे समोर आले होते.
टीव्ही मालिकेमधून प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री शगुफ्ता अली सध्या हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत. गेल्या चार वर्षापासून त्या बेरोजगार आहेत. संपूर्ण बचत संपली आहे त्यामुळे सध्या आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. हातात कोणतेच काम नसल्याने उदरनिर्वाह आणि पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना मदत मागण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नव्हता. आर्थिक अडचण दूर व्हावी म्हणून कामाच्याशी शोधात होत्या. पण कोरोनामुळे तेही शक्य झाले नाही. घरातल्या वस्तू विकून त्या गुजराण करत असल्याचे समोर आले होते.
शगुफ्ता कर्करोगानेही ग्रस्त आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट झाली की त्यांच्या उपचारासाठीही त्यांच्याकडे पुरेस पैसे शिल्लक नाहीत. त्यांची व्यथा ऐकल्यानंतर नुकतेच बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टींने त्यांना मदतीचा हात दिला. त्याचपाठोपाठ आता डान्स दिवाने शोच्या टीमने माधुरीसह शगुफ्ता यांना अडचणीतून बाहेर काढणार असल्याचे आश्वासन दिले आहे. इतकेच नाहीतर त्यांना ५ लाखाचा चेक देत आर्थिक मदतही केली आहे.
डान्स दिवानेच्या मंचावर आगामी भागात अनिल कपूर, रोहित शेट्टीसह अनेक दिग्गज कलाकार शोमध्ये हजेरी लावणार आहेत. या कलाकारांच्या येण्याने शोमध्ये आणखीन रंगत येणार आहे. त्याचबरोबर काही भावूक क्षणही पाहायला मिळणार आहे. यावेळी शोमध्ये शगुफ्तादेखील विशेष अतिथी म्हणून मंचावर हजेरी लावणार आहेत. शगुफ्ताने त्यांची आपबीती सांगताच सारेच भावूक झाले.
यावेळी त्यांच्या कठीण समयी सगळ्यांनी एकत्र येत त्यांना मदत केली पाहिजे. शगुफ्ता यांनी चित्रपटसृष्टी, दिग्गज कलाकार आणि समाजाने पुढे येऊन मदतीचा हात देणे गरजेचे आहे.