डान्स इंडिया डान्स फेम शक्ती मोहन फॅन्सवर का भडकली?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2017 11:59 AM2017-01-02T11:59:31+5:302017-01-02T11:59:31+5:30
डान्स इंडिया डान्स या डान्स रिअॅलिटी शोमुळे प्रसिद्धीझोतात आलेली शक्ती मोहन फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवर तिच्या फॅन्सवर चांगलीच ...
ड न्स इंडिया डान्स या डान्स रिअॅलिटी शोमुळे प्रसिद्धीझोतात आलेली शक्ती मोहन फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवर तिच्या फॅन्सवर चांगलीच भडकली होती. ती मॅनली असल्याचे अनेकजण तिला नेहमीच म्हणतात. तिला मॅनली म्हणणाऱ्या याच लोकांना तिने सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिले.
कोणाच्या रंगावरून अथवा शरीराच्या आकारावरून त्यांच्यावर विनोद करणे यात काही नवीन राहिलेले नाही. कलाकारांनादेखील अशा प्रकारच्या कमेंट्सना सामोरे जावे लागते. शक्ती मोहनची शरीराची रचना ही एखाद्या मुलासारखी असल्याचे काही सोशल नेटवर्किंगवरील लोकांनी नुकतेच तिला म्हटले. पण अशा प्रतिक्रियांबद्दल वाईट मानून घेण्यापेक्षा शक्तीने तिची खिल्ली उडवणाऱ्या या लोकांना चांगलेच धारेवर धरले. तिने या सगळ्यांना उत्तर देताना म्हटले आहे की, "मी मुलाप्रमाणे चालते, मुलाप्रमाणे बसते, माझे शरीर अगदी मुलांसारखेच आहे. तसेच माझा आवाज मुलींसारखा मधुर नसून मुलांसारखा आहे असे मला अनेकजण बोलून दाखवतात. या सगळ्यामुळे मी अनेक वर्षांपासून मी जे नाही आहे, त्यात स्वतःला बसवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला कोणत्याही कॅटगरीमध्ये बसवायला लोकांना का आवडते हेच मला कळत नाही. तुम्ही जसे आहात तसे राहा, दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे बंद करा. दुसऱ्यांसाठी बारीक व्हायचे, त्यांच्यासाठी मेकअप करायचा, त्यांच्यासाठी एखादा मास्क घालून वावरायचे या गोष्टी तुम्ही किती काळ करणार आहात. तुम्ही केवळ तुमच्यासाठी जगू शकता किंवा इतरांसाठी जगू शकता... त्यामुळे तुम्ही कोणासाठी जगायचे आहे ते तुम्ही तुमचे ठरवा."