स्टीव्ह ज्यरवाने जिंकला India's Best Dancer 4 चा किताब; ट्रॉफीसोबत पटकावली इतकी रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 10:24 AM2024-11-11T10:24:30+5:302024-11-11T10:25:05+5:30

India's Best Dancer 4 चा विजेता झालेल्या स्टीव्हवर बक्षीसांचा वर्षाव झालाय

dancer steve jyarwa win India's Best Dancer 4 and got 15 lakh rupess and trophy | स्टीव्ह ज्यरवाने जिंकला India's Best Dancer 4 चा किताब; ट्रॉफीसोबत पटकावली इतकी रक्कम

स्टीव्ह ज्यरवाने जिंकला India's Best Dancer 4 चा किताब; ट्रॉफीसोबत पटकावली इतकी रक्कम

काल India's Best Dancer 4 या शोचा ग्रँड फिनाले पार पडला. या ग्रँड फिनालेमध्ये मेघालय, शिलॉंगमध्ये वास्तव्यास असणाऱ्या स्टीव्ह ज्यरवा India's Best Dancer 4 चा महाविजेता झालाय. स्टीव्हने फार कमी वयात India's Best Dancer 4 सारख्या राष्ट्रीय पातळीवरच्या मोठ्या शोचं विजेतेपद जिंकल्याने त्याचं नशीब पालटलं आहे. स्टीव्हला बक्षीस म्हणून १५ लाख रुपये आणि India's Best Dancer 4 ची चमचमती ट्रॉफी देण्यात आलीय. 

India's Best Dancer 4 चा विजेता स्टीव्ह

India's Best Dancer 4 चा विजेता स्टीव्हला १५ लाख रुपये रोख पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय स्टीव्हचे कोरिओग्राफर रक्तिम ठाकुरिया यांना ५ लाख पुरस्कार अशी विजयी रक्कम देण्यात आलीय. स्टीव्हला India's Best Dancer 4 ची चमचमती ट्रॉफीही मिळाली आहे. India's Best Dancer 4 च्या फिनालेमध्ये स्टीव्हसोबत हर्ष केशरी, नेक्स्टियन, नेपो, आदित्य मालवीय, आकांक्षा मिश्रा उर्फ ​​अकिना हे स्पर्धक सहभागी होते. अखेर सर्वांवर मात करुन स्टीव्हने India's Best Dancer 4 च्या विजेतेपदावर मोहोर उमटवली आहे.


विजयी झाल्यावर स्टीव्ह काय म्हणाला?

स्टीव्ह ज्यरवाने ट्रॉफी जिंकल्यावर त्याचं मत मांडलंय. तो म्हणाला की, "India's Best Dancer 4 चा विजेता होणं हे माझ्यासाठी एक स्वप्न आहे. हा प्रवास अनेक अडचणी आणि आव्हानांनी भरलेला होता. हा संपूर्ण प्रवास माझ्यासाठी अविश्वसनीय होता. माझे कोरिओग्राफर रक्तिम ठाकुरिया आणि या प्रवासात ज्यांनी मला साथ दिली त्या सर्व चाहत्यांचे मी खूप आभार मानतो. ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्या सर्वांचा हा विजय आहे." अशा भावना स्टीव्हने शेअर केल्या.

Web Title: dancer steve jyarwa win India's Best Dancer 4 and got 15 lakh rupess and trophy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.