करण वाही करणार ‘डान्स इंडिया डान्स : बॅटल ऑफ दि चॅम्पियन्स’चे सूत्रसंचालन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 07:15 IST2019-07-01T07:15:00+5:302019-07-01T07:15:00+5:30
आपली अभिनयाची कारकीर्द सांभाळतानाच करणने अनेक पुरस्कार सोहळे आणि रिअॅलिटी कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही केले आहे.

करण वाही करणार ‘डान्स इंडिया डान्स : बॅटल ऑफ दि चॅम्पियन्स’चे सूत्रसंचालन!
छोट्या पडद्यावरील ‘डान्स इंडिया डान्स : बॅटल ऑफ दि चॅम्पियन्स’ या शोचे सुत्रसंचालन करण्याची जबाबदारी अभिनेता करण वाहीला दिली आहे. करण वाहीने 2004 मध्ये टीव्हीवरील कार्यक्रमांमध्ये पदार्पण केल्यापासून त्याच्या लोकप्रियतेचा आलेख सतत चढताच राहिला. आपली अभिनयाची कारकीर्द सांभाळतानाच करणने अनेक पुरस्कार सोहळे आणि रिअॅलिटी कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही केले आहे.
करणने यापूर्वी ‘डीआयडी सुपरमॉम्स’ या कार्यक्रमाच्या दुसर््या आवृत्तीचेही सूत्रसंचालन केले होते आणि आता तो पुन्हा एकदा डीआयडीच्या व्यासपिठाकडे वळला आहे.
या नव्या जबाबादारीविषयी करण वाही म्हणाला, “देशातील गुणी नर्तकांसाठी डान्स इंडिया डान्स हे सर्वात प्रतिष्ठेचे व्यासपीठ आहे. मी यापूर्वी ‘डीआयडी सुपरमॉम्स’ या कार्यक्रमाच्या दुसर््या आवृत्तीचेही सूत्रसंचालन केलं होतं आणि तो कार्यक्रमसुध्दा या डान्स इंडिया डान्सचाच एक भाग होता.
आता अधिक भव्य आणि दिमाखदार स्वरूपात सुरू झालेल्या डान्स इंडिया डान्सच्या या नव्या आवृत्तीसाठी सूत्रसंचालन करण्यासाठी मी फार उत्सुक आहे. या आवृत्तीद्वारे बॉलीवूडची सुपरस्टार करीना कपूर-खान ही टीव्ही कार्यक्रमात पदार्पण करत आहे.