CID मधील दरवाजा तोडणारा दया एका एपिसोडसाठी घ्यायचा इतके लाख रूपये मानधन, जाणून घ्या महिन्याचं इन्कम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 11:51 AM2021-12-11T11:51:17+5:302021-12-11T11:57:19+5:30
अनेकांना ठाऊक नसेल पण अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी दयानंद शेट्टी (Dayanand Shetty) या हा एक खेळाडू होता.
भारतात असा कोणी नसेल ज्याला सोनी टिव्हीवरील सर्वात जुनी आणि लोकप्रिय मालिका 'सीआयडी' (CID) पाहिली नाही. जवळपास 2 दशके चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या या शोमधील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी दाद दिली. कार्यकमातील एक लोकप्रिय पात्र होते इन्स्पेक्टर दयाचे. जो दरवाजा तोडण्यासाठी प्रसिद्ध होता. याशिवाय एसीपी प्रद्युम्नचा 'कुछ तो घडा है दया' हा डायलॉगही चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे.सीआयडी या मालिकेचे इन्स्पेक्टर दयाचे पात्र दयानंद शेट्टी (Dayanand Shetty) याने साकारले होते. या मालिकेमुळे त्याला ख-या अर्थाने लोकप्रियता मिळाली होती. दयानंद शेट्टी आज आपला 52 वा वाढदिवस साजरा करतो आहे.
खरे तर ही दयानंदची (Dayanand Shetty) पहिली मालिका होती. पण त्याची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. अनेकांना ठाऊक नसेल पण अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी दयानंद शेट्टी हा एक खेळाडू होता. 1994 मध्ये महाराष्ट्रातून डिस्कस थ्रोचा तो चॅम्पियन होता.
डिस्कस थ्रो या गेममध्ये चॅम्पियन झाल्यानंतर दयानंदकडे अभिनयाची संधी चालून आली. सीआयडी कार्यक्रमासाठी त्याने ऑडिशन दिले आणि हे ऑडिशन त्याने पासही केले. इन्स्पेक्टर दयाच्या भूमिकेसाठी त्याची निवड झाली. या दयाची एक दिवसाचे मानधन किती माहितीये? तर 1 लाख रूपये. एका दिवसाच्या शुटिंगसाठी दया एक लाख रुपये घ्यायचा. याचा अर्थ दया दररोज शूटिंग करत असेल तर त्यांची महिन्याची कमाई 30 लाख रुपये व्हायची.
दयानंद शेट्टीने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. यात सिंघम रिटर्न्स, जॉनी गद्दार आणि रनवे या सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
सीआयडी मालिकेतच्या सुरुवातीच्या काळात मोनी आंबेगावकरने काम केले होते. यादरम्यान दयानंद व मोना यांच्यात अफेअर असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.