'दे धमाल' फेम अभिनेत्याचा पार पडला साखरपुडा, स्पृहा जोशीने केली मजेशीर कमेंट; पाहा Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 17:51 IST2023-11-23T17:41:04+5:302023-11-23T17:51:47+5:30
प्रिया बापट, स्पृहा जोशी या स्टार अभिनेत्री मालिकेत होत्या.

'दे धमाल' फेम अभिनेत्याचा पार पडला साखरपुडा, स्पृहा जोशीने केली मजेशीर कमेंट; पाहा Photos
मराठीतील लोकप्रिय मालिका 'दे धमाल' (De Dhamal) मध्ये अनेक असे बालकलाकार होते जे आज यशस्वी अभिनेता/अभिनेत्री आहेत. प्रिया बापट, स्पृहा जोशी या स्टार अभिनेत्री मालिकेत होत्या. मालिकेतील सर्वच बालकलाकार अगदीच ८ ते १२ वयोगटातील होते. त्यांच्याच एका चिमुकल्या सहकलाकाराचा नुकताच साखरपुडा झाला आहे. कोण आहे तो अभिनेता?
2001 साली आलेल्या 'दे धमाल' या मालिकेने लहान मुलांना प्रेमातच पाडलं होतं. प्रत्येक बालकलाकाराने साकारलेली भूमिका ही आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यातलाच एक बालकलाकार अनुराग वरळीकर (Anurag Worlikar) याचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. त्याने मालिकेत चिनु हे पात्र साकारलं होतं. पायल साळवी हिच्याशी तो लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अनुराग आणि पायल यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.ब्लॅक सूटमध्ये अनुराग खूपच हँडसम दिसत असून रॉयल ब्लू रंगाच्या वेस्टर्न गाऊनमध्ये पायल सुंदर दिसत आहे. 'कधीही न संपणाऱ्या अॅडव्हेंचरसाठी तयार' असं त्याने कॅप्शन दिलं आहे.
अनुरागच्या साखरपुड्याच्या या पोस्टवर अभिनेत्री आणि मालिकेतील त्याची सहबालकलाकार स्पृहा जोशीने मजेशीर कमेंट केली आहे. 'सुराला कच्चा आहे पण मुलगा चांगला आहे अभिनंदन अनुराग!' असं तिने लिहिलं आहे.
अनुराग केवळ अभिनेताच नसून दिग्दर्शकही आहे. 'दे धमाल' मालिकेशिवाय त्याने 'बारायण','पोर बाजार','देवकी' या सिनेमांमध्येही त्याने काम केले होते. देवकी हा त्याचा पहिला चित्रपट होता ज्यामध्ये अलका कुबल यांच्यासोबत त्याला काम करण्याची संधी मिळाली. तर काही वर्षांपूर्वी आलेल्या डॉक्टर डॉन मालिकेत तो श्वेता शिंदेच्या मुलाच्या भूमिकेत दिसला. सध्या अनुराग दिग्दर्शनाकडे वळला आहे.