सुसाईड नोट लिहून अभिनेत्री कुलजीत रंधावाने केली होती आत्महत्या, गळफास घेत संपवले होते आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 10:29 AM2021-02-08T10:29:01+5:302021-02-08T10:44:19+5:30
Death Anniversary : 2006 साली आजच्याच दिवशी जगाला सोडून गेली होती कुलजीत...
हिप हिप हुर्रे, रिश्ते, क्यों होता है प्यार, कम्बख्त इश्क, कुमकुम आणि कुसूम अशा अनेक सुपरहिट मालिकांमध्ये दिसलेला एक चेहरा काळाच्या पडद्याआड गेला. या शोमध्ये काम करून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री कुलजीत रंधावा आज आपल्यात नाही. मात्र तिच्या आठवणी आपल्यासोबत आहेत. 8 फेब्रुवारी 2006 रोजी कुलजीतने आत्महत्या केली होती. उण्यापु-या 30 वर्षांच्या कुलजीतच्या आत्महत्येने सर्वांना धक्का बसला होता. कुलजीतने आत्महत्या केली, हे कोणीही मानायला तयार नव्हते. आजही ही अभिनेत्री आपल्यात नाही, यावर विश्वास बसत नाही.
मुंबईच्या आपल्या फ्लॅटमध्ये कुलजीतचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला होता. आत्महत्येपूर्वी ती एक सुसाईड नोट मागे सोडून गेली होती. माझ्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार ठरवण्यात येऊन नये. मी आयुष्यातील दबाव सहन करू शकले नाही, त्यामुळे मी आत्महत्या करतेय, असे तिने या सुसाईड नोटमध्ये लिहिले होते.
काही लोकांच्या मते, कुलजीतने प्रेमभंगामुळे इतके टोकाचे पाऊल उचलले होते. मीडिया रिपोर्टनुसार, ती तिचा सह-कलाकार भानु उदयसोबत प्रेमात होती. दोघांच्या नात्यात मतभेद वाढल्यानंतर आणि प्रेमभंगाचे दु:ख सहन न झाल्याने कुलजीतने आत्महत्या केली.
कुलजीतने एकता कपूरच्या अनेक मालिकेत काम केले होते.