देबिना आणि गुरमीत दोन लेकींसह नव्या घरात केला गृहप्रवेश, पाहा त्यांच्या आलिशान घराची पहिली झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 11:31 IST2022-12-17T11:30:22+5:302022-12-17T11:31:33+5:30
टीव्हीवरील 'राम' आणि 'सीता' म्हणून लोकप्रिय असलेल्या गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी यांनी त्यांच्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे.

देबिना आणि गुरमीत दोन लेकींसह नव्या घरात केला गृहप्रवेश, पाहा त्यांच्या आलिशान घराची पहिली झलक
Debina Bonner Gurmeet Choudhary Grah Pravesh Video: टीव्हीवरील 'राम' आणि 'सीता' म्हणून लोकप्रिय असलेल्या गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी यांनी त्यांच्या आयुष्यातील एक नवीन प्रवास सुरू केला आहे. या स्टार कपल आता दोन गोंडस मुलींचं आई-बाबा झालेत. आपल्या लाडक्या लेकींसह गुरमीत आणि देबिनाने आपल्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. अलिकडेच त्यांच्या नवीन घरात हाऊस वॉर्मिंग झाले, ज्याचा व्हिडिओ देबिना बॅनर्जीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
देबिना अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यापासून दूर आहे, पण तिच्या 'देबिना डीकोड्स' या यूट्यूब चॅनलद्वारे तिच्या चाहत्यांशी कनेक्ट आहे. अलिकडेच, अभिनेत्रीने व्लॉगद्वारे तिच्या नवीन घराच्या गृहप्रवेशाची झलक दाखवली. व्हिडिओच्या सुरुवातीला अभिनेत्रीने सांगितले की, तिला दोन्ही मुलींसोबत नव्या घरात शिफ्टिंग करणं थोडं कठीण जात आहे, त्यामुळे वेळ लागत आहे. मात्र, हळूहळू दोघेही शिफ्टिंग करतायेत.
देबिना-गुरमीतच्या नवीन घरात गृह प्रवेश
यानंतर देबिना बॅनर्जी तिच्या घरातील गृह प्रवेशाची झलक दाखवते. गुरमीत चौधरी आपल्या नवीन घरात पूजा करताना दिसला. त्यानंतर देबिना आणि गुरमीत आपल्या दोन्ही मुलींसह नवीन घरात प्रकेलावेश . यादरम्यान गुरमीत चौधरी त्याच्या दोन्ही लाडक्या मुलींवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसला .देबिना बॅनर्जी यलो कलरच्या शरारा सूटमध्ये सुंदर दिसत होती. तर गुरमीत नेहमीप्रमाणे लाल कुर्त्यामध्ये चार्मिंग दिसत होता.