'मी गर्भपात करायला हवा होता का?' दुसऱ्या प्रेग्नंसीवरुन ट्रोल करणाऱ्यांना देबीनाचं सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 03:08 PM2022-08-19T15:08:39+5:302022-08-19T15:09:02+5:30

Debina bonnerjee: अलिकडेच देबीनाने इन्स्टाग्रामवर आस्क मी एनीथिंग हे सेशन ठेवलं होतं. यात काही नेटकऱ्यांनी तिला खोचक प्रश्न विचारले.

debina bonnerjee second pregnancy timing for another baby | 'मी गर्भपात करायला हवा होता का?' दुसऱ्या प्रेग्नंसीवरुन ट्रोल करणाऱ्यांना देबीनाचं सडेतोड उत्तर

'मी गर्भपात करायला हवा होता का?' दुसऱ्या प्रेग्नंसीवरुन ट्रोल करणाऱ्यांना देबीनाचं सडेतोड उत्तर

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री देबीना बॅनर्जी (debina bonnerjee) लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे. ४ महिन्यांपूर्वी देबीनाने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. त्यानंतर आता ती पुन्हा दुसऱ्यांदा आई होणार आहे. काही दिवसांपूर्वीच देबीनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली. मात्र, देबीनाची पोस्ट पाहिल्यावर अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. या ट्रोलर्सला आता तिने सडेतोड शब्दांत उत्तर दिलं आहे.

१६ ऑगस्टला देबीनाने इन्स्टाग्रामवर एक फॅमिली फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तिचा पती  गुरमीत चौधरी, चार महिन्यांची लेक दिसत होती. सोबतच देबीनाने तिच्या हातात सोनोग्राफीचा फोटो धरला होता. हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी त्यावर संमिश्र प्रतिक्रिया दिली. काहींनी तिला ट्रोल केलं. तर, काहींनी शुभेच्छा दिल्या. परंतु, ट्रोल करणाऱ्यांना देबीनाने सडेतोड उत्तर दिलं आहे.

अलिकडेच देबीनाने इन्स्टाग्रामवर आस्क मी एनीथिंग हे सेशन ठेवलं होतं. यात काही नेटकऱ्यांनी तिला खोचक प्रश्न विचारले. अगदी दुसरं बाळ नॅच्युरली कंन्सिव्ह झालं का? इथपासून ते दुसऱ्या बाळासाठी एवढी घाई का? असेही प्रश्न तिला विचारण्यात आले. यातील काही प्रश्नांची तिने उत्तरं दिली.

दुसऱ्या बाळाचा विचार करताना दोघांमध्ये थोडं अंतर असायला हवं होतं, असा सल्ला एकाने देबीनाला दिला. त्यावर उत्तर देत देबीनानेच त्याला प्रतिप्रश्न केला. ज्या लोकांना ट्विन्स होतात त्यावेळी ते लोक दोन बाळांना कसं सांभाळतात? त्यावेळी त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल?, असा प्रश्न देबीनाने विचारला. तर, निदान दोन मुलांमध्ये एक वर्षाचं तरी अंतर ठेवायचं होतं असं अन्य एका युजरने म्हटलं. त्यावर, मग मी काय गर्भपात करायला हवा होता का? 

दरम्यान, देबीना लग्नानंतर जवळपास ५ वर्ष बाळासाठी प्रयत्न करत होती. मात्र, काही अडचणी येत होत्या. देबीनाने २ IVFs  आणि ३ IUIs ट्रिटमेंट केल्या होत्या. परंतु, त्या फेल गेल्या. तसंच काही थेरपीदेखील तिने केल्या होत्या. अखेर ३ एप्रिल रोजी तिने तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला.
 

Web Title: debina bonnerjee second pregnancy timing for another baby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.