राम कपूरने त्याच्या वजनाबाबत घेतला हा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2018 09:27 AM2018-05-25T09:27:18+5:302018-05-25T14:57:18+5:30
राम कपूरला आपण घर एक मंदिर, कसम से, बडे अच्छे लगते है यांसारख्या अनेक मालिकांमध्ये पाहिले आहे. अनेक चित्रपटातही ...
र म कपूरला आपण घर एक मंदिर, कसम से, बडे अच्छे लगते है यांसारख्या अनेक मालिकांमध्ये पाहिले आहे. अनेक चित्रपटातही तो महत्त्वाच्या भूमिका साकारतो. घर एक मंदिर या मालिकेतील रामच्या कामाचे कौतुक झाले असले तरी त्या मालिकेमुळे त्याला तितकीशी प्रसिद्धी मिळाली नव्हती. पण कसम से मालिकेमुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. बडे अच्छे लगते है या मालिकेने त्याचे संपूर्ण करियर बदलले असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. आज राम हा छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध अभिनेता आहे. रामने काही वर्षांपूर्वी राखी का स्वयंवर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते. तसेच नुकताच कॉमेडी हाय स्कूल या कार्यक्रमात तो सूत्रसंचालकाच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसला होता आणि आता राम जिंदगी के क्रॉसरोड्स या कार्यक्रमात सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
आपण जे जीवन जगतो ते आपण केलेल्या विविध निवडींचे परिणाम असते. सोनी टीव्ही लवकरच भारतीय टेलिव्हिजनवर काल्पनिक आणि बिन-काल्पनिक यांचा संयोग करणारा एक आगळा वेगळा कार्यक्रम जिंदगी के क्रॉसरोड्स घेऊन येत आहे. जीवनात आपण जे निर्णय घेतो आणि त्यामुळे आपल्या जीवनाला जो आकार मिळतो, त्याबाबत असलेला हा कार्यक्रम अंतर्दृष्टी आणि अभिप्राय यांची एक भावनिक सफर असल्याचा दावा आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यासाठी राम खूपच उत्सुक आहे. या कार्यक्रमाच्या प्रमोशनच्या दरम्यान त्याने नुकत्याच खूप साऱ्या गप्पा मारल्या. रामने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले असले तरी कधीही तो पोराणिक मालिकेत झळकलेला नाहीये आणि यापुढे देखील आपल्याला त्याला कधी पौराणिक मालिकेत पाहायला मिळणार नाहीये. कारण कधीच कोणत्या पौराणिक मालिकेत काम करायचे नाही असे रामने ठरवले आहे. त्याचसोबत या मुलाखतीत रामने अजून एक गुपित उलगडले आहे.
रामच्या अभिनयासोबतच त्याच्या वजनाबाबत मीडियात नेहमीच चर्चा होत असते. रामने वजन कमी करावे असे त्याच्या सगळ्याच चाहत्यांचे म्हणणे आहे. पण आजवर रामने नेहमीच या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आहे. मात्र रामने आता त्याचे वजन कमी करण्याचे ठरवले आहे. याविषयी राम सांगतो, मी सध्या थोडे वजन कमी केले आहे. माझे वय आता वाढते आहे आणि माझी मुले देखील मोठी होत आहेत. त्यामुळे फिट होणे आता माझ्यासाठी गरजेचे आहे असे मला वाटते.
Also Read : हे छोट्या पडद्यावरचे कलाकार चित्रपटातील अभिनेत्यांपेक्षाही कमावतात जास्त पैसे