'रंग माझा वेगळा' मालिकेच्या सेटवरील दीपा आणि कार्तिकीची ऑफस्क्रीन धमाल मस्ती, पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 14:08 IST2021-12-11T14:08:13+5:302021-12-11T14:08:46+5:30
Rang Maza Vegla : दीपा आणि कार्तिकीचा 'रंग माझा वेगळा' मालिकेच्या सेटवरील ऑफस्क्रीन व्हिडीओला मिळतेय चाहत्यांची पसंती

'रंग माझा वेगळा' मालिकेच्या सेटवरील दीपा आणि कार्तिकीची ऑफस्क्रीन धमाल मस्ती, पाहा व्हिडीओ
स्टार प्रवाह वाहिनीवरील रंग माझा वेगळा (Rang Maza Vegla) मालिकेने फार कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील दीपा आणि कार्तिकी बऱ्याचदा चर्चेत येत असते. त्यांची ऑनस्क्रीन जशी छान केमिस्ट्री आहे तशीच ऑफस्क्रीनदेखील छान केमिस्ट्री आहे. हे त्यांच्या सोशल मीडियावरील व्हिडीओतून समजते. नुकताच दीपा आणि कार्तिकीचा रंग माझा वेगळा मालिकेच्या सेटवरील व्हिडीओ समोर आला आहे.
रंग माझा वेगळा मालिकेत दीपाची भूमिका रेश्मा शिंदे (Reshma Shinde)ने साकारली आहे तर कार्तिकीची भूमिका सायशा भोईर (Saisha Bhoir) निभावत आहे. नुकताच रेश्मा शिंदेने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रेश्मा सायशाचे लाड करताना दिसत आहे. या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळते आहे. या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. एका चाहत्याने लिहिले की, खूपच गोड आहे छोटी परी. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, अगं बाई किती लाड होतात चिंटुकलीचे. तर आणखी एकाने म्हटले की एक नंबर माय-लेक.
रंग माझा वेगळा मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. मालिकेत दीपाने कार्तिकसोबतचा घटस्फोट मान्य असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर तिची तब्येत बिघडते आणि ती कार्तिकच्या रुग्णालयात दाखल होते. त्यामुळे पुन्हा एकदा कार्तिक आणि दीपा एकत्र पाहायला मिळत आहे. त्यात दीपा आणि सौंदर्याची भेट होते. कार्तिक आणि दीपामध्ये गैरसमज कोणी निर्माण केला आणि दीपाने कार्तिकला घटस्फोट देण्यासाठी मंजुरी का दिली, यामागचे कारण सौंदर्या शोधून काढणार आहे. त्यामुळे आता पुढे काय घडणार आहे, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.