दीपा चौधरीनं 'तू चाल पुढं'च्या सेटवरील पहिला आणि शेवटच्या दिवसाचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाली- "नेहमीच..."
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 12:17 PM2024-01-10T12:17:38+5:302024-01-10T12:18:03+5:30
Tu Chaal Pudha Serial : 'तू चालं पुढं' ही मालिका दाखल झाली. या मालिकेतून बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर अभिनेत्री दीपा परब-चौधरी हिने छोट्या पडद्यावर कमबॅक केले. तिने या मालिकेत साकारलेली अश्विनी नामक गृहिणीची भूमिका प्रेक्षकांना खूपच भावली.
झी मराठी वाहिनीवर २०२२ साली 'तू चालं पुढं' (Tu Chaal Pudha) ही मालिका दाखल झाली. या मालिकेतून बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर अभिनेत्री दीपा परब-चौधरी (Deepa Parab-Chaudhari) हिने छोट्या पडद्यावर कमबॅक केले. तिने या मालिकेत साकारलेली अश्विनी नामक गृहिणीची भूमिका प्रेक्षकांना खूपच भावली. ती प्रेक्षकांना त्यांच्या घरातील एक सदस्य वाटू लागली होती. दरम्यान आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या निमित्ताने दीपाने इंस्टाग्रामवर मालिकेच्या सेटवरील व्हिडीओ शेअर करत आपली भावना व्यक्त केली आहे.
दीपा परब-चौधरी हिने इंस्टाग्रामवर तू चाल पुढं मालिकेच्या सेटवरील पहिला आणि शेवटच्या दिवसाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिले की, तू चाल पुढंच्या ह्या सेटवरील पहिला दिवस आणि शेवटचा दिवस नेहमीच मनात घर करुन राहील.
या व्हिडीओत पाहायला मिळतंय की, ती किचन आवरून घराबाहेर पडते आहे. तर शूटच्या शेवटच्या दिवशी दरवाज्या बाहेर उभी राहून पाया पडताना दिसत आहे. किचनमध्ये जाते. यावेळी ती खूप इमोशनल झालेली दिसत आहे. किचनमध्ये ठेवलेल्या गणपतीची मुर्ती सोबत घेऊन जात असल्याचे सांगते. घरात फेरफटका मारत आहे. या व्हिडीओत ती म्हणते की, सेटवरचा शेवटचा दिवस आहे आणि आम्ही दुसरीकडे जात आहोत. म्हणून गणूला बरोबर घेऊन जात आहे. मी तुमची खूप आभारी आहे.
प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
एका युजरने लिहिले की, पहिल्यापासून जशी चालू झाली तशी ही मालिका खूप पॉझिटिव्ह एनर्जी देऊन गेले आयुष्यामध्ये माझ्या म्हणून ही खूप हृदयाजवळची मालिका म्हणून ओळख राहणार या मालिकेमुळे माझे स्वतःचे अस्तित्व निर्माण होऊन आज स्वतःच्या पायावरती उभा राहून यशस्वीरित्या अश्विनी सारखेच भरारी घेते.. अश्विनी ची सुरुवातीला स्वप्न पाहिले तीच उराशी बाळगून यशस्वीप्रयत्न करते.. हा सीन बघून डोळ्यात पाणी यायला वेळ नाही लागला. दुसऱ्या व्यक्तीने लिहिले की, मला वाटते या घरात शूट करायचा शेवटचा दिवस आहे. तर आणखी एकाने म्हटले की, दिपा ताई... खरंच तू होतीस म्हणून ... असो... झी मराठी चे आभार... कोणा एकाचे नावं घेता येणार नाही... संपूर्ण टीम चे आभार... मालिकेचा शेवट होत असला तरी प्रत्येकाच्या आयुष्यातील पुढची नवी सुरुवात आहेच... आपल्यातल्या प्रत्येका साठी... तू चाल पुढं...