दीपक कलाल म्हणतो, राखीसोबत Live मधुचंद्र बिग बॉसच्या घरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 18:22 IST2019-05-31T18:21:58+5:302019-05-31T18:22:38+5:30
राखी सावंतने इंस्टाग्राम अकाउंटवर दीपक कलालसोबतचा एक फोटो शेअर केला आहे आणि या फोटोसोबत तिने ते दोघे लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉसच्या तेराव्या सीझनमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे.

दीपक कलाल म्हणतो, राखीसोबत Live मधुचंद्र बिग बॉसच्या घरात
राखी सावंत नेहमी वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. कॉन्ट्रव्हर्सियल क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली राखी पुन्हा एकदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आली आहे. राखीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर दीपक कलालसोबतचा एक फोटो शेअर केला आहे आणि या पोस्टसोबत तिने सांगितले की, ते दोघे लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉसच्या १३ व्या सीझनमध्ये सहभागी होणार आहेत.
राखीने सलमान खान व कलर्स वाहिनीचेदेखील आभार मानले. तिने लिहिले की, सलमान खान व कलर्स वाहिनीचे आभार.
दीपक कलालनेदेखील तोच फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि सलमाम खान व वाहिनीचे आभार मानले आहे. याशिवाय त्याने लिहिले, लाइव्ह मधुचंद्र होणार आता बिग बॉसच्या घरात. तुम्ही एक्साइटेड आहात का?
सध्या तरी राखी व दीपकने शेअर केलेल्या पोस्टला सर्वांनी मस्करीत घेतले आहे. त्या दोघांनी चुकीचा हॅशटॅग वापरला आहे. त्यासोबतच दोघांनी सलमान खान व बिग बॉसची स्पेलिंग चुकीची लिहिली आहे.
मागील वर्षी राखी व दीपक यांच्या लग्नांची अफवा पसरली होती. त्यानंतर त्या दोघांनी प्रसारमाध्यमांसमोर देखील लग्न करत असल्याचे सांगितले होते. पण तसे केले नाही.
बिग बॉसचा १३ वा सीझन २९ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये सहभागी होण्यासाठी निर्मात्यांनी सेलिब्रेटीजना अप्रोच करायला सुरूवात केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार करण पटेल, झरीन खान व अंकीता लोखंडेला विचारण्यात आल्याचे समजते आहे.