दीपिकाने धर्म बदलला? वेडिंग कार्डवर दिसलं भलतंच नाव, सोशल मीडियावर चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 01:10 PM2023-04-05T13:10:04+5:302023-04-05T13:11:30+5:30
दीपिकाने निकाह होण्यापूर्वी इस्लाम धर्म स्वीकारला? नक्की सत्य काय वाचा
'ससुराल सिमर का' या मालिकेतून घराघरात पोहोचलेलं टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कपल शोएब इब्राहिम (Shoaib Ibrahim) आणि दीपिका कक्कर (Dipika Kakar) यांची लग्नपत्रिका सध्या व्हायरल होत आहे. 22 फेब्रुवारी 2018 रोजी दीपिका आणि शोएबचा निकाह झाला. तेव्हा दीपिकाने धर्मबदल केल्याचं बोललं गेलं. आता त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. कारण त्यांच्या वेडिंग कार्डमध्ये दीपिकाचं नाव बदललेलं दिसत आहे.
शोएब आणि दीपिकाच्या व्हायरल होत असलेल्या वेडिंग कार्डमध्ये दीपिकाचं नाव 'फैजा' असं दिसत आहे. यामुळे दीपिकाने निकाह होण्यापूर्वी इस्लाम धर्म स्वीकारला यावर शिक्कामोर्तब झाला आहे. मात्र हे अर्धसत्य आहे. मग खरं नेमकं काय आहे बघुया.
बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, दीपिकाने आपलं नाव 'फैजा' असं नक्कीच ठेवलं होतं पण ते केवळ निकाहपुरतं. तिने खरोखर आपलं नाव बदललेलं नाही. हे फक्त लग्नपत्रिकेसाठी करण्यात आलं. दीपिकाच्या निकटवर्तीयाच्या सांगण्यानुसार 'तिने धर्म बदललेला नाही. तिचं नाव दीपिका कक्करच आहे आणि आता त्यापुढे इब्राहिम असं आहे. तिने फैजा हे केवळ लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेत वापरलं होतं.'
दीपिका लग्नानंतर ५ वर्षांनी गरोदर राहिली आहे. लवकरच त्यांच्या घरात छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. काही दिवसांपूर्वीच दोघांनी ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती.