'तेरी मेरी डोरियां' मालिकेतील मुख्य जोडीला दीपिका-रणवीरनं केलंय प्रेरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 07:12 PM2023-01-05T19:12:20+5:302023-01-05T19:13:15+5:30

Teri Meri Doriya: ‘तेरी मेरी डोरियां’ मालिका भव्य टेलिव्हिजन प्रीमियरसाठी सज्ज आहे आणि 3 मोंगा बहिणी आणि 3 ब्रार बंधू यांच्यातील विरोधाभासी तरीही रोमांचक केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Deepika-Ranveer inspired the lead pair of the serial 'Teri Meri Doriyan' | 'तेरी मेरी डोरियां' मालिकेतील मुख्य जोडीला दीपिका-रणवीरनं केलंय प्रेरीत

'तेरी मेरी डोरियां' मालिकेतील मुख्य जोडीला दीपिका-रणवीरनं केलंय प्रेरीत

googlenewsNext

स्टार प्लस(Star Plus)चा ‘तेरी मेरी डोरियां’ (Teri Meri Doriya) मालिका भव्य टेलिव्हिजन प्रीमियरसाठी सज्ज आहे आणि 3 मोंगा बहिणी आणि 3 ब्रार बंधू यांच्यातील विरोधाभासी तरीही रोमांचक केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. हा शो त्याच्या भव्य व्हिज्युअल आणि भव्य सेटअपसह जितका फिल्मी आहे, तितकाच यातील जोडप्यांच्या केमिस्ट्रीमध्ये देखील बॉलिवूडचा स्पर्श आहे, ज्यामुळे मालिकेला चारचाँद लागले आहेत.

मोंगा बहिणी- ब्रार भाऊ यांची ही जोडी आपल्याला बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडपे दीपिका-रणवीरची आठवण करून देतात. आतापर्यंत, प्रेक्षकांनी  ‘तेरी मेरी डोरियां’चे अनेक प्रोमोज पाहिले आहेत आणि त्यातील साहिबाची सुंदरता आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध पार्श्वभूमी त्यांना दीपिका पादुकोणची आठवण करून देते, तर अंगद, जो प्रशस्त आणि भौतिकदृष्ट्या श्रीमंत कुटुंबातील आहे, रणवीर सिंग सोबत साम्य सांगतो. 

आपल्याला माहिती आहे की दीपिका पादुकोण सुंदर आणि स्वभावत:  शांत आहे मात्र त्याच वेळी, रणवीर सिंग ऊर्जा आणि सळसळता उत्साह याने भरपूर आहे! असे म्हणतात की जोड्या स्वर्गात बनल्या जातात. स्टारप्लसने ‘तेरी मेरी डोरियां’ची जोडीही काही कमी नाही यावर विश्वास निर्माण केला आहे.  'तेरी मेरी डोरियाँ' पंजाबमधील एका अतिशय सुंदर ठिकाणी घडते. तेरी मेरी दूरियाँ दर सोमवार ते रविवार, संध्याकाळी ७ वाजता स्टार प्लस वाहिनीवर पाहता येईल.

Web Title: Deepika-Ranveer inspired the lead pair of the serial 'Teri Meri Doriyan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.