पहिला घटस्फोट घेतल्यानंतर दुस-यांदा केले लग्न तरीही एकाकी जगते आयुष्य, दोन मुलांचाही करते एकटीच सांभाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 20:43 IST2020-09-08T20:42:37+5:302020-09-08T20:43:12+5:30
2012 मध्ये दीपशिखा आणि केशवचे लग्न झाले होते. याआधीही दीपशिखाने अभिनेता जीत उपेंद्रशी पहिले लग्न केले होते.

पहिला घटस्फोट घेतल्यानंतर दुस-यांदा केले लग्न तरीही एकाकी जगते आयुष्य, दोन मुलांचाही करते एकटीच सांभाळ
लग्नाच्या गाठी या स्वर्गातच जुळतात असे म्हणतात. पण काहीवेळा या जुळलेल्या गाठी शेवटपर्यंत टीकण्यासाठी नसतात. असेच काहीसे झाले आहे अभिनेत्री दिपशिखा नागपालसोबत. दिपशिखाने आतापर्यंत दोन लग्न केले आहेत पण हे दोन्ही लग्न टिकले नाही. आता तिच्या या तुटलेल्या लग्नांबद्दल तिनेही कधीच बोलणे पसंत केले नाही. तिच्या या तुटलेल्या लग्नाबद्दल तिने कधीही खुलासे केले नाहीत. आता लोक काय म्हणतील यापेक्षा तिला काय करायचे आहे आणि कसे जगायचे आहे यावर तिने तिचे लक्ष केंद्रित केले. लग्न आणि प्रेम हे दोन्ही विषय तिच्यासाठी पूर्णपणे संपले होते. सिंगल मदर बनत ती आजही तिच्या दोन्ही मुलांचा सांभाळ करत आहे.
टीव्ही अभिनेत्री दीपशिखा नागपाल लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत गणली जायची. वेगवेगळ्या मालिकेतून तिने काम करत रसिकांची मनं जिकंली आहेत. सध्या लाइमलाइटपासून दूर आहे. परंतू वेळोवेळी तिची झलक सोशल मीडियावर दिसत असते. नुकतेच तिने काही फोटोज तिच्या सोशल अकाउंटवर शेअर केलेत.याच फोटोंमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.
दीपशिखाचे अॅक्टींग करिअर जितके यशस्वी ठरले तितके तिचे वैवाहिक आयुष्य यशस्वी ठरले नाही. तिचे वैवाहिक आयुष्य वादग्रस्त राहिले. दिपशिखाने 6 वर्षांपूर्वी; आपल्या दुसर्या पतीला घटस्फोट दिला आहे. 2012 मध्ये दीपशिखा आणि केशवचे लग्न झाले होते. याआधीही दिपशिखाने अभिनेता जीत उपेंद्रशी पहिले लग्न केले होते. लग्नाच्या काही वर्षांतच दोघांचे वेगवेगळ्या कारणांवरून खटके उडू लागले आणि शेवटी दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.
सोशल मीडियावरही ती बरीच सक्रिय असते. आपल्या खासगी आणि सिनेमा तसंच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. साध्या आणि पारंपरिक अंदाजात ती जितकी सुंदर दिसते तितकाच तिचा ग्लॅमरस अंदाजही रसिकांना तितकाच भावतो. याआधीही तिचे बरेच फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते.