Bigg Boss OTT 3: अबब! दिवसाला ४० हजार कमावते वडापाव गर्ल? बिग बॉसच्या घरात खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 12:58 PM2024-06-22T12:58:15+5:302024-06-22T12:59:16+5:30

'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये व्हायरल वडापाव गर्लने तिच्या रोजच्या कमाईबद्दल खुलासा केलाय (chandrika dixit, bigg boss ott 3)

delhi viral vadapav girl chandrika dixit earn 40 thousand per day bigg boss ott 3 | Bigg Boss OTT 3: अबब! दिवसाला ४० हजार कमावते वडापाव गर्ल? बिग बॉसच्या घरात खुलासा

Bigg Boss OTT 3: अबब! दिवसाला ४० हजार कमावते वडापाव गर्ल? बिग बॉसच्या घरात खुलासा

कालपासून 'बिग बॉस ओटीटी 3' सुरु झालंय. 'बिग बॉस ओटीटी 3' च्या घरात तब्बल १६ स्पर्धकांची एन्ट्री झाली. एकापेक्षा एक वेगळ्या स्वभावाच्या स्पर्धकांची एन्ट्री 'बिग बॉस ओटीटी 3' च्या घरात झालीय. 'बिग बॉस ओटीटी 3' मधील सर्वात चर्चेत असलेली स्पर्धक म्हणजे दिल्लीची व्हायरल वडापाव गर्ल अर्थात चंद्रिका दीक्षित. चंद्रिकाने 'बिग बॉस ओटीटी 3'च्या घरात आल्यावर ती दिवसाला किती रुपये कमावते याचा खुलासा केलाय. 

चाळीस हजार रुपये दिवसाची कमाई: चंद्रिका

दिल्लीची व्हायरल वडापाव गर्ल अशी ओळख असलेली चंद्रिका दीक्षित काल 'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये सहभागी झाली. पिंकविलाने केलेल्या बातमीनुसार यावेळी घरात आल्यावर तिने घरच्यांशी बोलताना ती दिवसाला किती रुपये कमावते याचा उल्लेख केला. चंद्रिका म्हणाली,  "मी दिवसाला ४० हजार कमावते. वडापाव विकून माझी इतकी कमाई होते, असं मीडिया रिपोर्टमध्ये आहे. याशिवाय लोक मी घेतलेल्या गाडीवर, मोबाईलवर, घरावर टीका करतात. जर मी चांगले पैसे कमवत असेल तर ते कसे खर्च करायचे याचा मला हक्क आहे. जर माझी कमाई चांगली असेल तर त्यातून स्वतःसाठी चांगल्या वस्तू मी नक्कीच घेऊ शकते." चंद्रिकाची कमाई ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

वडापाव गर्ल बिग बॉसच्या घरात

'वडापाव गर्ल' अशी ओळख असलेली चंद्रिका आधी पूर्णवेळ नोकरी करायची. पण जेव्हा कोविडच्या काळात तिच्या मुलाची तब्येत बिघडली तेव्हा चंद्रिका आणि तिचा पती यश गेरा यांना नोकरी सोडावी लागली. दोघांनीही आपल्या मुलाची काळजी घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर दोघांनी दिल्लीत वडापावचा स्टॉल लावला आणि काही वेळातच त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. मुंबई स्टाईलमध्ये वडापाव विकण्याची चंद्रिका आणि तिच्या नवऱ्याची कल्पना एकदम शानदार असल्याने लोकांची गर्दी होऊ लागली. 

Web Title: delhi viral vadapav girl chandrika dixit earn 40 thousand per day bigg boss ott 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.