Confirm! दिल्लीच्या व्हायरल 'वडापाव गर्ल'ची 'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये एन्ट्री, पहिली झलक समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 16:01 IST2024-06-19T16:01:14+5:302024-06-19T16:01:30+5:30
आपल्या वक्तव्यांनी आणि वादविवादांमुळे चर्चेत असलेली दिल्लीमधील व्हायरल वडापाव गर्ल आता 'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये दिसणार (vadapav girl, bigg boss ott 3)

Confirm! दिल्लीच्या व्हायरल 'वडापाव गर्ल'ची 'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये एन्ट्री, पहिली झलक समोर
'बिग बॉस ओटीटी 3' ची उत्सुकता शिगेला आहे. या वेळी सलमान खान नव्हे तर अनिल कपूर 'बिग बॉस ओटीटी 3'चं सूत्रसंचालन करणार आहेत. त्यामुळे अनिल 'बिग बॉस ओटीटी 3' चं सूत्रसंचालन कसं करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. याशिवाय 'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये कोणते स्पर्धक दिसणार याकडेही अनेकांचा डोळा आहे. अशातच 'बिग बॉस ओटीटी 3'मध्ये सहभागी होणाऱ्या पहिल्या स्पर्धकाचा खुलासा झालाय. ही स्पर्धक दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे दिल्लीची व्हायरल वडापाव गर्ल.
'बिग बॉस ओटीटी 3'मध्ये व्हायरल वडापाव गर्ल
दिल्लीची 'वडापाव गर्ल' म्हणजेच चंद्रिका गेल्या काही महिन्यांपासून विविध कारणांमुळे चर्चेत आहे. आता चंद्रिका 'बिग बॉस OTT 3' ची पहिली स्पर्धक झाली आहे. काहीच तासांपुर्वी जिओने आपल्या ट्विटर हँडलवर एक ब्लर फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये एक मुलगी वडापावच्या गाडीवर दिसत असून तिच्या आसपास बरेच लोक दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये Jio ने लिहिले आहे की, '#BiggBossOTT3 चा पहिला स्पर्धक कोण आहे? या #TeekhiMirchi ची झलक पाहण्यासाठी, #JioCinemaPremium ला भेट द्या.' हा फोटो समोर येताच ही स्पर्धक दुसरी तिसरी कोणी नसून ती वडापाव गर्ल चंद्रिका असल्याचं अनेकांनी ओळखलंय.
कोण आहे वडापाव गर्ल चंद्रिका?
'वडापाव गर्ल' अशी ओळख असलेली चंद्रिका आधी पूर्णवेळ नोकरी करायची. पण जेव्हा कोविडच्या काळात तिच्या मुलाची तब्येत बिघडली तेव्हा चंद्रिका आणि तिचा पती यश गेरा यांना नोकरी सोडावी लागली. दोघांनीही आपल्या मुलाची काळजी घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर दोघांनी दिल्लीत वडापावचा स्टॉल लावला आणि काही वेळातच त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. मुंबई स्टाईलमध्ये वडापाव विकण्याची चंद्रिका आणि तिच्या नवऱ्याची कल्पना एकदम शानदार असल्याने लोकांची गर्दी होऊ लागली.
Kalesh b/w Viral Vadapav Girl, Her Mom and Crowd on Road (Context in Clip)
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) April 26, 2024
pic.twitter.com/yjyWhzOxhO
चंद्रिकाने अनेकदा ओढवून घेतले वाद
एकीकडे चंद्रिका गेरा दीक्षितच्या स्टॉलवर गर्दी वाढत होती. तर दुसरीकडे तिला अनेक वादांना आणि ट्रोलींगलाही सामोरे जावे लागले. चंद्रिका आणि तिच्या पतीवर वडापावाच्या नावाने पावात बटाट्याच्या टिक्की विकल्याचा आरोप करण्यात आला. याशिवाय जेव्हा ग्राहकांनी तिला चार पेक्षा जास्त वडापाव पॅक करण्यास सांगितले तेव्हा तिने स्पष्टपणे नकार दिला. ज्यामुळे अनेक फूड ब्लॉगर्सनी तिच्यावर टीकाही केली. तिचा रोखठोक स्वभाव, अधिकाऱ्यांनी तिच्या गाडीवर कारवाई केल्यावर तिने केलेला राडा अशा अनेक गोष्टींमुळे चंद्रिका चर्चेत आली. आता हीच चंद्रिका उर्फ 'वडापाव गर्ल' बिग बॉसच्या घरात काय राडे करणार, हे पाहणं कुतुहलाचा विषय आहे.