हटके अंदाजात विक्रमने मधुराला घातली लग्नाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 15:16 IST2018-12-12T15:16:26+5:302018-12-12T15:16:58+5:30

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'छत्रीवाली' मालिकेतील मधुरा आणि विक्रमच्या नात्यात बरेच चढउतार पाहायला मिळत आहेत.

The demand for married couples with a set of antique records | हटके अंदाजात विक्रमने मधुराला घातली लग्नाची मागणी

हटके अंदाजात विक्रमने मधुराला घातली लग्नाची मागणी

ठळक मुद्देमधुरा आणि विक्रमच्या नात्यात येणार बरेच चढउतार

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'छत्रीवाली' मालिकेतील मधुरा आणि विक्रमच्या नात्यात बरेच चढउतार पाहायला मिळत आहेत. मधुरावर जीवापाड प्रेम करणाऱ्या विक्रमने बऱ्याचदा आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.

मधुराला वेगवेगळी सरप्राईजेसही दिली आहेत. एवढेच नाही तर त्याने आपला जीव धोक्यात घालून मधुराला मनवण्याचा प्रयत्न केला. मधुराचे प्रेम जिंकण्यासाठी विक्रम वाट्टेल ते करायला तयार आहे. त्यासाठी त्याने आणखी एक शक्कल शोधून काढली आहे. मधुराला लग्नाची मागणी घालण्यासाठी विक्रम सज्ज झाला आहे आणि तेही बँड बाजा घेऊन. नवरदेवाप्रमाणे हातात फुलांची माळ घेऊन तो मधुराला लग्नासाठी विचारणा करणार आहे. छत्रीवाली मालिकेचा हा रंगतदार एपिसोड १७ जानेवारीला प्रेक्षकांना पहाता येणार आहे.
मधुराला इम्प्रेस करण्याचा विक्रमचा हा प्रयत्न यशस्वी होणार का? विक्रमच्या प्रेमाचा मधुरा स्वीकार करणार का? याचा उलगडा महासोमवारच्या भागामध्ये होणार आहे. 
‘छत्रीवाली‘ या मालिकेत प्रेक्षकांना एका मुलीची कथा पाहायला मिळणार आहे. छत्रीवाली ही गोष्ट आहे आत्मविश्वासू, कष्टाळू आणि साधेपणात सौंदर्य शोधणाऱ्या मधुराची. तर तिकडे जबाबदारीचं भान नसलेला, लाडात वाढलेला मधुराच्या अगदी विरुद्ध स्वभावाचा आणि तिच्या साधेपणाची सतत टिंगल उडवणारा विक्रम आहे.  या मालिकेने नुकताच १०० एपिसोड्सचा टप्पा पार केला. मालिकेचे शंभर भाग पूर्ण झाल्यामुळे सेटवर उत्साहाचं वातावरण होतं. छत्रीवाली मालिकेच्या यापुढील भागांमध्येही नवनवी वळणे येऊन मालिकेचे कथानक अधिक रंजक होणार आहे.

Web Title: The demand for married couples with a set of antique records

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.