देवेंद्र फडणवीस आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या कलाकारांची एअरपोर्टवर झाली ग्रेट भेट!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 01:45 PM2022-08-27T13:45:21+5:302022-08-27T13:53:20+5:30

देवेंद्र फडणवीसआणि आपले हास्यजत्रेचे कलाकार एकाच विमानाने प्रवास करत होते. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस ही प्रवासादरम्यान हास्यजत्रा कार्यक्रमाचे भाग पाहत होते.

Deputy cm Devendra Fadnavis and Maharashtrachi Hasya Jatra artist had meet at the airport! | देवेंद्र फडणवीस आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या कलाकारांची एअरपोर्टवर झाली ग्रेट भेट!

देवेंद्र फडणवीस आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या कलाकारांची एअरपोर्टवर झाली ग्रेट भेट!

googlenewsNext

महाराष्ट्राचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाला पाहिलं जातं. हास्यजत्रेतील समीर चौगुले, प्रिथ्वीक प्रताप, रसिका वेंगुर्लेकर, वनिता खरात हे दमदार कलाकार आता नागपूरकरांच्या भेटीस आले आहेत. नागपूर दौऱ्यानिमित्त विमानाने प्रवास करताना त्यांची भेट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झाली. देवेंद्र फडणवीसआणि हास्यजत्रेचे कलाकार एकाच विमानाने प्रवास करत होते. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस ही प्रवासादरम्यान हास्यजत्रा कार्यक्रमाचे मागील भाग पाहत होते. हा निव्वळ योगायोग म्हणावा.

कलाकारांना भेटल्यावर त्यांनी कलाकारांचे, कार्यक्रमाचे कौतुक केले. त्यांच्या बिझी शेड्युलमध्ये ही ते प्रवासा दरम्यान वा फावल्या वेळेत महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम पाहणे पसंत करतात. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील कलाकारांची नागपूर एअरपोर्टवरील ही ग्रेट भेट कायम लक्षणीय असेल.


महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलेला हा कार्यक्रम असून रसिक मायबाप या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद देत आहेत. आता नागपूरकरांच्या भेटीस आलेले हे कलाकार काय कल्ला घालणार हे पाहणं रंजक ठरेल. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा मंच रसिकांना निखळ आनंद देत असून हास्यजत्रेतील एकेक पात्र रसिकांना त्यांच्या घरातलं वाटतं.

 


 

Web Title: Deputy cm Devendra Fadnavis and Maharashtrachi Hasya Jatra artist had meet at the airport!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.