'झुमका' गाण्यावर मिसेस उपमुख्यमंत्र्याचा डान्स, अमृता फडणवीसांचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2023 13:09 IST2023-11-18T13:03:13+5:302023-11-18T13:09:43+5:30
अमृता यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्या आलिया भट्टच्या 'व्हॉट झुमका' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

'झुमका' गाण्यावर मिसेस उपमुख्यमंत्र्याचा डान्स, अमृता फडणवीसांचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अमृता अनेकदा त्यांचे फोटो शेअर करताना दिसताना. पण सध्या त्यांच्या एका व्हिडिओची चर्चा रंगली आहे. अमृता या गायिका आहेत. पण, गायिका असण्याबरोबरच त्यांनी डान्सची झलकही नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडिओतून दाखवली आहे.
अमृता यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्या आलिया भट्टच्या 'व्हॉट झुमका' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. गाडीत बसून अमृता यांनी हा रील व्हिडिओ बनवला आहे. मिसेस उपमुख्यमंत्र्यांच्या या रील व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्सचा वर्षाव करत कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. 'व्हॉट झुमका' गाण्यावर रील केलेल्या अमृता यांच्या कानात मात्र झुमक्यांऐवजी गोल कानातले दिसत आहे. ही गोष्ट नेटकऱ्यांना खटकली आहे. त्यांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत.
"झुमका कसला ते बैलगाडीचं चाक आहे," अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने "झुमका आहे की सायकलची रीम" असंही एकाने म्हटलं आहे. "झुमका कुठे आहे पण", असंही एकाने म्हटलं आहे.
अमृता फडणवीस या पेशाने बँकर आहेत. त्यांनी अनेक गाणी गाऊन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अनेक कार्यक्रमांनाही त्या उपस्थित राहतात. अनेकदा त्या काही गोष्टींबद्दलचं आपलं मतंही ट्वीटच्या माध्यमातून व्यक्त करताना दिसतात.