​नकुशी तरी हवीहवीशी या मालिकेमुळे उपेंद्र लिमयेच्या मुलाची ही इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2017 12:28 PM2017-04-20T12:28:42+5:302017-04-20T17:58:42+5:30

नकुशी तरी हवीहवीशी या मालिकेत उपेंद्र लिमये रणजीत शिंदे ही भूमिका साकारत आहे. या त्याच्या भूमिकेला आणि मालिकेला प्रेक्षकांचा ...

This is the desire of Upendra Limaye's son for this series of Nakushi Havihavi | ​नकुशी तरी हवीहवीशी या मालिकेमुळे उपेंद्र लिमयेच्या मुलाची ही इच्छा

​नकुशी तरी हवीहवीशी या मालिकेमुळे उपेंद्र लिमयेच्या मुलाची ही इच्छा

googlenewsNext
ुशी तरी हवीहवीशी या मालिकेत उपेंद्र लिमये रणजीत शिंदे ही भूमिका साकारत आहे. या त्याच्या भूमिकेला आणि मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील त्याच्या आणि नकुशीच्या केमिस्ट्रीची तर चांगलीच चर्चा आहे. या मालिकेचे नुकतेच चित्रीकरण शिमला येथेदेखील करण्यात आले आहे. या मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. या मालिकेत उपेंद्र आपल्याला एका साध्या चाळीत राहात असल्याचे पाहायला मिळत आहे. या मालिकेतून आपल्याला चाळ संस्कृती जाणून घ्यायला मिळत आहे. खरे तर आताच्या फ्लॅट संस्कृतीत राहाणाऱ्या नवीन पिढीला चाळीत राहाण्याची गंमत कधीच अमुभवायला मिळालेली नाही. त्यामुळे आपणदेखील ही गंमत अनुभवूया आणि एखाद्या चाळीत राहायला जाऊया अशी इच्छा उपेंद्र लिमयेच्या मुलाने व्यक्त केली आहे. 
नकुशी मालिकेतील चाळीतील वातावरण पाहून आपणदेखील चाळीत राहूया ना असा जणू हट्टच उपेंद्र लिमयेच्या मुलाने धरला आहे. उपेंद्र हा मुळचा पुण्याचा असून त्याचे सगळे बालपण हे सदाशिवपेठेतल्या वाडा संस्कृतीत गेले आहे. वाडा संस्कृती ही चाळ संस्कृतीप्रमाणेच असते. त्यामुळे उपेंद्र त्याच्या मुलाशी गप्पा मारताना त्याला नेहमीच त्याच्या वाड्यातील लोकांच्या गमतीजमती सांगत असे. त्यामुळे त्याच्या मनात नेहमीच चाळसंस्कृतीविषयी उत्सुकता आहे. पण ही मालिका सुरू झाल्यापासून तर त्याला चाळ संस्कृती खूपच आवडायला लागली आहे.
नकुशी या मालिकेतील बग्गीवाला चाळ आणि त्यातल्या गमतीशीर व्यक्तिरेखा उपेंद्रच्या मुलाला प्रचंड भावतात. या मालिकेचे चित्रीकरण करायला सुरुवात केल्यापासून उपेंद्रच्यादेखील जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत आणि त्याच्या मुलालादेखील चाळीतल्या जीवनाचे कुतूहल वाटू लागले आहे. 

Web Title: This is the desire of Upendra Limaye's son for this series of Nakushi Havihavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.