Bigg Boss 18: अभिनेत्रीने थेट बिग बॉसलाच सुनावलं! हिंदी-इंग्रजी भाषेवरुन घरात हाय वोल्टेज ड्रामा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 03:19 PM2024-10-18T15:19:50+5:302024-10-18T15:20:38+5:30

Bigg Boss 18 मध्ये घरातील स्पर्धकाने थेट बिग बॉसलाच फटकारलं असल्याची गोष्ट घडलंय. बघा व्हिडीओ

Despite warning from Bigg Boss actress eisha singh talk in english not hindi video viral | Bigg Boss 18: अभिनेत्रीने थेट बिग बॉसलाच सुनावलं! हिंदी-इंग्रजी भाषेवरुन घरात हाय वोल्टेज ड्रामा

Bigg Boss 18: अभिनेत्रीने थेट बिग बॉसलाच सुनावलं! हिंदी-इंग्रजी भाषेवरुन घरात हाय वोल्टेज ड्रामा

सध्या Bigg Boss 18 ची चांगलीच चर्चा आहे. सलमान खान पुन्हा एकदा या शोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळतोय. सलमान खानच्या होस्टिंगची चर्चा आहे. अशातच Bigg Boss 18 च्या घरातले सदस्यही त्यांच्या विविध स्वभावांमुळे सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. सध्या Bigg Boss 18 चा एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या प्रोमोत ईशा सिंहने "मला हिंदीत बोलता येत नाही" असं म्हणत थेट बिग बॉसला सुनावल्याची घटना घडलीय. 

बिग बॉसने इशारा देऊनही ईशा ऐकेना

Bigg Boss 18 चा एक नवीन प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या प्रोमोत ईशा सिंह घरातील स्पर्धक चुम दरांगसोबत बोलत असते. तेव्हा बिग बॉस तिला मध्येच थांबवून हिंदी भाषेत संवाद साधण्यास सांगतात. तेव्हा ईशा बिग बॉसवर चांगलीच भडकते. ती ओरडून म्हणते, "मला नाही बोलायचंय हिंदीत. मला हिंदीत बोलता येत नाही. मला इंग्रजी भाषेत बोलण्यात जास्त कंफर्टेबल वाटतं. मला नाही माहित हिंदीत कसा संवाद साधतात."

ईशाने बिग बॉसलाच सुनावलं

पुढे पुन्हा एकदा ईशा इंग्रजीत बोलायला लागली. तेव्हा पुन्हा एकदा बिग बॉसने तिला इंग्रजी बोलण्यावरुन टोकलं. त्यामुळे ईशा पुन्हा बिग बॉसवर भडकली. ईशा म्हणाली, "मला हिंदी बोलता येत नाहीय. मला हिंदीत नाही बोलायचंय. मी अजिबात हिंदीत बोलू शकत नाही." अशाप्रकारे ईशा आणि बिग बॉसमध्ये तू तू मै मै झालेली दिसली. आता ईशाने हिंदी बोलायला नकार दिल्याने बिग बॉस तिच्यावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Web Title: Despite warning from Bigg Boss actress eisha singh talk in english not hindi video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.