घोड्यावरुन झाली 'देवमाणूस' फेम अभिनेत्याची एन्ट्री, किरण गायकवाडच्या वरातीत थिरकले सेलिब्रिटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 17:11 IST2024-12-14T17:10:48+5:302024-12-14T17:11:14+5:30
घोड्यावरुन आली 'देवमाणूस' फेम अभिनेत्याची वरात, किरण गायकवाडच्या लग्नसोहळ्यातील व्हिडिओ समोर

घोड्यावरुन झाली 'देवमाणूस' फेम अभिनेत्याची एन्ट्री, किरण गायकवाडच्या वरातीत थिरकले सेलिब्रिटी
सध्या कलाविश्वात लगीनघाई सुरू आहे. एकामागोमाग एक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. नुकतंच शिवा फेम अभिनेता शाल्व किंजवडेकर लग्नाच्या बेडीत अडकला. शाल्वने गर्लफ्रेंड श्रेया डफळापूरकरसोबत सात फेरे घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. शाल्वनंतर आता देवमाणूस फेम अभिनेता किरण गायकवाड बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे.
किरण गायकवाड अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरसोबत आज (१४ डिसेंबर) लग्न करणार आहे. कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत किरण आणि वैष्णवी सात फेरे घेत नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहेत. लग्नसोहळ्यातील किरणच्या वरातीतील व्हिडिओ समोर आला आहे. किरणने घोड्यावरुन लग्नाच्या मंडपात एन्ट्री घेतली. या व्हिडिओत कलाकार मंडळीही डान्स करताना दिसत आहेत.
किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकरची १३ डिसेंबरला सकाळी साखरपुडा पार पडला. त्यानंतर हळदीचा कार्यक्रम होता आणि रात्री संगीत सोहळा पार पडला. या तिन्ही कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. आता ते लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. त्यांचे चाहते त्या दोघांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांच्या लग्नासाठी मराठी इंडस्ट्रीतील बरेच कलाकार उपस्थित आहेत.